AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हावर्ड हेल्थने सांगितल्या ‘या’ सात टिप्स… कोरोना जवळपासही फिरकणार नाही…

हॉवर्ड हेल्थने (Harvard Health) रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधांव्यतिरिक्त सात असे उपाय सुचवले आहे, ज्यामाध्यमातून आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

हावर्ड हेल्थने सांगितल्या ‘या’ सात टिप्स... कोरोना जवळपासही फिरकणार नाही...
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 4:20 PM
Share

जगभरात कोरोनाचे रुग्ण प्रचंड संख्येने वाढत आहे. भारतात आतापर्यंत 2 लाख 47 हजार 417 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. तर रोजचा पॉझिटीव्हीटी रेट हा 13.11 टक्के तर आठवड्याचा पॉझिटीव्हीटी (Positivity) रेट हा 10.80 टक्के नोंदवला गेला आहे. देशात कोरोना संसर्ग सुरू असताना दुसरीकडे मृत्यूदेखील होत आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान लस उपलब्ध झाली असली तरी या विषाणूचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जात आहे. तज्ज्ञांकडून रोगप्रतिकारशक्ती (Immune Syste) वाढविण्यासाठीचे विविध सल्ले तसेच उपाय सांगण्यात येत आहे. ओमिक्रॉन (Omicron) हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी घातक असला तरी, त्याला रोखण्यासाठी सर्वांचेच युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच हॉवर्ड हेल्थने (Harvard Health) रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधांव्यतिरिक्त सात असे उपाय सुचवले आहे, ज्यामाध्यमातून आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

1) संतुलित आहार घ्यावा

आपला दैनंदिन आहार हा विविधांगी असावा, त्यात विविध फळे, पालेभाज्या, प्रथिने, संपूर्ण धान्य आणि भरपूर पाण्याचा समावेश असावा. यातून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात ॲंटीऑक्सिडेंट असल्याने ते शरीरास लाभदायक असते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने त्याचा रस पिण्याऐवजी त्याला कापून खाणे कधीही चांगले.

2) पूरक औषधींचा विचार करा

अनेक प्राण्यांच्या अभ्यासातून झिंक, सेलेनियम, लोह, फॉलिक ऍसिड, जीवनसत्त्वे A, B6, C, D आणि E च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक प्रतिक्रिया बदलत असल्याचे आढळून आले आहे. हे पोषक घटक अनेक प्रकारे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे, आपल्याला बॅक्टेरिया, विषाणूजन्य आणि इतर संसर्ग होण्याची शक्यता असते. जर समतोल आहार सहज उपलब्ध नसेल, तर पोषणासाठी RDA समृद्ध मल्टीविटामिन उपयुक्त ठरू शकते.

3) धूम्रपान करू नका

‘पबमेड सेंट्रल’मध्ये (Pubmed Central) प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, धूम्रपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. धूम्रपानामुळे अनेक आजारदेखील निर्माण होत असतात. त्यामुळे यकृतच नव्हे उच्च रक्तदाबासह, ह्रदयाच्या समस्याही निर्माण होत असतात. याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही होत असतो.

४) नियमित व्यायाम करा

व्यायामामुळे नवीन कोरोना व्हेरिएंटविरुध्द रोगप्रतिकारशक्ती कशी सुधारू शकते, याबद्दल कोणतीही अचूक माहिती अद्याप समोर आली नसली तरी जे लोक नियमितपणे व्यायाम करतात त्यांना न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा टाळता येतो. व्यायामामुळे केवळ मृत्यूदरात घट होत नाही तर ग्लुकोज, लिपिड्स आणि इन्सुलिनच्या चयापचयावरही सकारात्मक परिणाम होत असतो.

५) पुरेशी झोप घ्या

आपले शरीर झोपेची आणि जागे होण्याच्या भावनांवरसुध्दा नियंत्रण ठेवत असल्याने झोपण्याची, उठण्याची रोजची वेळ निश्चित केली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्तीसाठी रात्री ७ ते ९ तासांची झोप गरजेची आहे. हॉवर्डचा अहवालानुसार, जर आपण झोपण्याच्या वेळेचे वेळापत्रक सुसंगत केले तर ते ‘सर्केडियन’ लय संतुलित करण्यास मदत करते.

६) तणावापासून लांब राहा

SimplyPsychology नुसार, जेव्हा आपण तणावाखाली असतो, तेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमी होते परिणामी आपणास संसर्गाची लवकर लागण होण्याची शक्यता असते. हॉवर्डच्या तज्ज्ञांच्या मते चांगल्या जीवनशैलीसाठी आपण काही धोरणे ठरवणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला तणाव वाटत असेल तेव्हा जाणीवपूर्वक श्वास घेण्याचा सराव करावा, प्राणायाम करा. लहान श्वासोच्छ्वासाचे व्यायाम तुमचा ताण दूर करण्यासाठी खूप मदत करतात.

७) सतत हात धुवा

कोविडचा संसर्ग पसरल्यापासून आपण अनेकांच्या तोंडून सतत हात धुण्याचा सल्ला एकलाच आहे. खरेतर कोरोना काळापासून आपण निरोगी जीवनशैली स्वीकारली आहे. दिवसातून अनेक वेळा हात धुण्याच्या सवयीमुळे लोकांना विषाणूचा संसर्ग होण्यापासून वाचवले आहे. तज्ज्ञांनुसार हात धुण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यास चांगल्या दर्जाच्या सॅनिटायझरने हात स्वच्छ करा. खाण्यापूर्वी, शौचालय वापरल्यानंतर, खोकलतांना किंवा शिंकल्यावर हात स्वच्छ करावा.

(टीप : हा लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर आहे, यातून कुठलाही सल्ला वा दावा करण्यात आलेला नाही. आपल्या डॉक्टरांशी बोलूनच आरोग्यविषयक सल्ला घ्यावा)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.