डोळ्यांना खाज सुटते? वाचा घरगुती उपाय
डोळ्यात जळजळ सुरू होते आणि परिणामी खाज सुटते. अशावेळी जर तुम्ही वारंवार डोळे खाजवले तर चिडचिड आणि इन्फेक्शनचा धोका अधिकच वाढतो. यासाठी काही खास घरगुती उपायांचा अवलंब करावा. आजींच्या काळापासून सुरू असलेल्या या टिप्स आहेत.

मुंबई: डोळ्यात खाज सुटणे ही एक सामान्य गोष्ट आहे. यामागे प्रदूषण, धूळ, धूर, संसर्ग अशी अनेक कारणे असू शकतात. यामुळे डोळ्यात जळजळ सुरू होते आणि परिणामी खाज सुटते. अशावेळी जर तुम्ही वारंवार डोळे खाजवले तर चिडचिड आणि इन्फेक्शनचा धोका अधिकच वाढतो. यासाठी काही खास घरगुती उपायांचा अवलंब करावा. आजींच्या काळापासून सुरू असलेल्या या टिप्स आहेत.
डोळ्यांना खाज सुटत असेल तर त्यावर उपाय
डोळे स्वच्छ पाण्याने धुवा
खाज येत असेल तर घाबरू नका. डोळ्यांवर स्वच्छ व थंड पाणी शिंपडावे. असे केल्याने डोळ्यांच्या चिडचिडेपणापासून तात्काळ आराम मिळेल. थंड पाणी डोळ्यांवर मारलं तर वारंवार खाज सुटणार नाही.
गुलाबजल
रसायनविरहित गुलाबजल डोळ्यांसाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. यासाठी कॉटन बॉलच्या साहाय्याने डोळ्यावर गुलाबजल लावा आणि काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
कोरफड जेल
त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण सहसा कोरफड जेल वापरतो, परंतु यामुळे डोळ्यांची खाज देखील दूर होऊ शकते कारण त्यात दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. यासाठी आपल्या कोरफडीच्या झाडाची पाने घेऊन त्यातील जेल घ्या. आता कापसाच्या साहाय्याने डोळ्यांभोवती ते कोरफड जेल लावा. थोड्या वेळाने डोळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.
दुधाचा वापर करा
जेव्हा डोळ्यांमध्ये अशी समस्या उद्भवते तेव्हा दुधाचा आधार घेतला जाऊ शकतो, कारण ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. खाज सुटत असेल तर कॉटन बॉलच्या साहाय्याने डोळ्यावर थंड दूध लावावे. असे केल्याने चिडचिड आणि डोळ्यांना सुटलेली खाज लवकर दूर होईल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)
