स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय, फक्त 5 मिनिटांत मेंदू बनेल सुपरफास्ट, स्वामी रामदेव यांनी सांगितले सोपे उपाय

स्वामी रामदेवजींच्या मते, योगासने आणि प्राणायामाद्वारे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवता येते. कान पकडून उठाबशा, सूर्य नमस्कार, कपालभाती आणि अनुलोम-विलोम हे प्राणायाम उपयुक्त आहेत.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय, फक्त 5 मिनिटांत मेंदू बनेल सुपरफास्ट, स्वामी रामदेव यांनी सांगितले सोपे उपाय
| Updated on: Sep 22, 2025 | 10:07 AM

हल्ली धावपळीच्या काळात प्रत्येकजण आपला मेंदू तल्लख राहावा, स्मरणशक्ती चांगली असावी असं वाटतं असतं. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अभ्यास आणि कामासाठी तीक्ष्ण बुद्धी गरजेची असते. हीच गोष्टी लक्षात घेऊन योगगुरू स्वामी रामदेव यांनी काही सोपे आणि महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. जर आपण रोज थोडे योग आणि प्राणायाम केले आणि सोबतच चांगला आहार घेतला, तर आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता खूप सुधारते, असे योगगुरू स्वामी रामदेव यांचे म्हणणं आहे.

मेंदूला तल्लख करणारी योगासने

योगशास्त्रात काही अशी आसने आहेत, जी थेट मेंदूच्या कार्याला चालना देतात. स्वामी रामदेव विशेषतः कान पकडून उठाबशा काढण्याचा सल्ला देतात. हा व्यायाम दिसायला सोपा असला, तरी तो मेंदूला ऊर्जा देण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे केवळ विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढत नाही, तर मोठ्यांनाही मानसिक थकव्यापासून आराम मिळतो.

तसेच, सूर्य नमस्कार हा देखील एक महत्त्वाचा योगा आहे. रोज काही वेळा सूर्य नमस्कार केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे मेंदूपर्यंत जास्त ऑक्सिजन पोहोचतो. त्यामुळे मेंदू ताजेतवाना होतो. तसेच सक्रिय राहतो. याशिवाय, दंड बैठक (पुश-अप) सारखे व्यायामही शरीर आणि मेंदूला मजबूत बनवतात.

प्राणायाम म्हणजे श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा अभ्यास. हा मेंदूच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक मानला जातो. कपालभाती आणि अनुलोम-विलोम यांसारखे प्राणायाम केल्याने तणाव कमी होतो. त्यामुळे मनाला शांती मिळते. जेव्हा मन शांत होते, तेव्हा आपोआपच आपली एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.

जंक फूड खाणे टाळा

योग आणि प्राणायामसोबतच आपला आहार चांगला असणेही गरजेचे आहे. जर तुम्ही पौष्टिक आहार घेत नसाल, तर तुमचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करू शकणार नाही. स्वामी रामदेव यांच्या मते, रोजच्या जेवणात ताजी फळे आणि हिरव्या भाज्या नक्कीच असाव्यात. यामुळे शरीराला आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात, जे मेंदूसाठीही खूप चांगले असतात. जास्त तळलेले, गोड पदार्थ आणि जंक फूड खाणे टाळा. कारण या गोष्टींमुळे शरीर आणि मेंदू दोन्ही आळशी बनतात. तसेच, दिवसभर पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे, कारण शरीरात जर पाण्याची कमतरता असेल तर मेंदूची कार्यक्षमता कमी होते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग आणि प्राणायाम जर दररोज केले तर आणि तरच याचा फायदा होतो. जर तुम्ही फक्त काही मिनिटे जरी हे व्यायाम केले, तरी हळूहळू तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढेल. यासोबतच तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप घ्या, कारण तणाव आणि अपुरी झोप यांचा थेट परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होतो.

Follow Us