AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारात मिळणारे चॉकलेट चिप्स कुकीज बनवा घरच्या घरी, ‘ही’ आहे सोपी रेसिपी

आपल्यापैकी अनेकांचा कधीकधी गोंधळ होतो की कुकीजमध्ये अंडी मिक्स आहेत की नाही. यामुळे, तुम्हाला कितीही खाण्याची इच्छा असली तरी तुम्ही हे कुकीज खाणे टाळता. मात्र आता तुम्ही हे चॉकलेट चिप्स कुकीज घरी सहज बनवू शकता. चला तर मग त्याची रेसिपी जाणून घेऊया.

बाजारात मिळणारे चॉकलेट चिप्स कुकीज बनवा घरच्या घरी, 'ही' आहे सोपी रेसिपी
| Edited By: | Updated on: Jun 13, 2025 | 3:25 PM
Share

लहान मुलं असोत वा मोठी माणसं बहुतेक लोकांना चॉकलेट किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खायला खूप आवडतात. चॉकलेट बिस्किटे असोत किंवा केक, त्याची चव अप्रतिमच लागते. पण बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक कुकीजमध्ये अंड मिक्स असतात, ज्यामुळे शाकाहारी लोकं हे कुकीज खाणे टाळतात. जर तुम्हालाही बेकरीमध्ये मिळणाऱ्या चविष्ट आणि कुरकुरीत चॉकलेट चिप कुकीजचे वेड असेल, तर आता हे चॉकलेट चिप कुकीज खरेदी करण्याची गरज नाही. तुम्ही अंड्यांशिवायही घरी सहज बनवू शकता. कारण घरगुती कुकीज केवळ चविष्टच नसतात तर त्या आरोग्यदायी देखील असतात.

चॉकलेट चिप कुकीजचे नाव ऐकताच तुम्हाला खाण्याची इच्छा होते. त्यामुळे गोड पदार्थांची तुमची क्रेविंगसुद्धा कमी होते आणि तुमचा मूडही सुधारतो. जेव्हा चॉकलेट चिप्सचे गोड-कुरकुरीत तुकडे प्रत्येक चाव्याव्दारे मऊ पिठात विरघळतात तेव्हा ते खाल्ल्यानंतर तुमचा मूड लगेचच आनंदी होतो. संध्याकाळच्या चहासोबत हे चॉकलेट चिप कुकीज खाण्याचा आनंद वेगळाच असतो. चला तर मग आजच्या या लेखात आपण या चॉकलेट चिप कुकीज कसे घरच्या घरी कसे बनवू शकतात ते जाणून घेऊयात…

चॉकलेट चिप कुकीजचे साहित्य

चॉकलेट चिप्स कुकीज बनवायला अगदी सोपी आहेत. तुम्ही हे अंड्यांशिवाय घरी बनवू शकता. तसेच घरी उपलब्ध असलेल्या काही सोप्या वस्तुंनी सुद्धा बनवता येतात. तर यासाठी तुम्हाला लागणारे आवश्यक साहित्य जाणून घेऊयात…

चॉकलेट

बटर

पांढरी साखर

ब्राऊन शुगर

दूध

व्हॅनिला अर्क

बेकिंग सोडा

बेकिंग पावडर

चॉकलेट चिप्स कुकीज कशा बनवायच्या?

चॉकलेट चिप्स कुकीज बनवण्यासाठी सर्वप्रथम बटर आणि साखर मोठ्या ताटात घेऊन हलके आणि मऊ म्हणजेच फ्लाफी होईपर्यंत मिक्स करा. आता त्यात दूध आणि व्हॅनिला मिक्स करा. आता दुसऱ्या भांड्यात चाळणीच्या मदतीने मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा मिक्स करा आणि यात वरील बटर व साखरेचे तयार मिश्रण त्यात टाकून मऊ पीठ तयार करा.

आता एका भांड्यात काही चॉकलेट चिप्स काढा जे तुम्ही टॉपिंग म्हणून वापरणार आहात. आता तयार केलेले पीठ एक तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.

आता त्याचे छोटे गोळे बनवा आणि त्यावर चॉकलेट चिप्स टाका. जर तुम्हाला जास्त चॉकलेट बिस्किटे बनवायची असतील तर तुम्ही त्यावर चॉकलेट सिरप लावू शकता आणि दुसऱ्या छोट्या पिठाच्या गोळ्याने झाकून ठेवू शकता. यानंतर ओव्हन मध्ये बेक करा. ओव्हन नसल्यास तुम्ही 40 मिनिटासाठी गॅसवर तवा ठेऊन त्यावर एक मोठे भांडे ठेवा ज्यात तुम्ही कुकीज बेक करू शकाल, आता या भांड्याच्या आत जाडे मीठ पसरवा 10 मिनिट प्री हिट होऊ द्या त्यानंतर यामध्ये कुकीज ट्रे ठेवा आणि बेक होऊ द्या. आता तुम्ही या कुकीज थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवू शकता. यामुळे त्या आणखी चविष्ट होतील आणि मुलांना चॉकलेट चिप्स कुकीज खूप आवडतील. ते एका आठवड्यासाठी सहज साठवता येतात.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक