AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही जर दूध पीत नसाल तर कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ 5 पेयांचे करा सेवन

दुध प्यायला सर्वांनाच आवडत नाही. त्यामुळे लहान असो वा मोठे अनेकजण दूध पिण्यास टाळाटाळ करतात. मात्र दूध हे कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. अशावेळेस जर तुम्ही दूध पीत नसाल तर ही काही पेये आहेत जी कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकतात. चला तर मग आजच्या या लेखात या पेयांबद्दल जाणून घेऊयात...

तुम्ही जर दूध पीत नसाल तर कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 पेयांचे करा सेवन
calcium
| Edited By: | Updated on: Jun 24, 2025 | 6:11 PM
Share

आजकाल प्रत्येकालाच माहित आहे की दुध हे एक कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. दुध प्यायल्याने हाडं तर मजबूत होतातच, पण स्नायूही मजबूत होतात. पण आपल्याकडे असे बरेचजण आहेत ज्यांना दुधाची चव आवडत नाही किंवा त्यात असलेले लैक्टोज इंटॉलिरेंट यामुळे दुध पिऊ शकत नाहीत. अशा लोकांना कॅल्शियमची कमतरता अधिक भासू शकते. कारण दूध कॅल्शियमच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक आहे. कॅल्शियम हे एक अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे, जे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे.

अशातच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे दुखणे किंवा ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका निर्माण होतो. तुम्ही जर दूध पीत नसाल तर आम्ही तुम्हाला असे काही पेये सांगणार आहोत जे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण भरून काढण्यास मदत करू शकतात. चला तर मग आजच्या या लेखात अशाच पेयांबद्दल जाणून घेऊयात…

सोया दूध

सोया दूध हे दुधाला एक उत्तम पर्याय आहे, खास करून अशा लोकांना ज्यांना लैक्टोज इंटॉलिरेंट आहे. सोया दूधमध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम असते आणि बहुतेकवेळा कॅल्शियम फोर्टिफाइड देखील असते. एक कप सोया दूधमध्ये सुमारे 300 मिलीग्राम कॅल्शियम असते, जे दुधासारखेच असते. याशिवाय हे दुध प्रथिने समृद्ध असते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

बदामाचे दूध

बदामाचे दूध हा आणखी एक पौष्टिक पर्याय आहे, जो कॅल्शियमने समृद्ध आहे. नैसर्गिक बदामाच्या दुधात कॅल्शियमचे प्रमाण कमी असले तरी, बाजारात उपलब्ध असलेल्या फोर्टिफाइड बदामाच्या दुधात प्रत्येक कपमध्ये 450 मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम असू शकते. याशिवाय ते प्यायल्याने व्हिटॅमिन-ई आणि हेल्दी फॅट मिळतात. याशिवाय त्यात कॅलरीज देखील कमी असतात आणि ते हृदयासाठी खूप फायदेशीर असते.

संत्र्याचे ज्यूस

संत्र्याचे ज्यूस हा व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे, परंतु कॅल्शियमयुक्त संत्र्याच्या ज्यूसमध्ये प्रति कप 350 मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम असू शकते. हे तुमच्या दैनंदिन कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यास मदत करते. याशिवाय संत्र्याचे ज्यूस हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आणि पचनासाठी देखील फायदेशीर असते.

ताक

ताक किंवा लस्सी हे दह्यापासून बनवलेले पेय आहे, जे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम तसेच प्रोबायोटिक्स असतात, जे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतात. एक कप ताकात सुमारे 300 मिलीग्राम कॅल्शियम असते. याशिवाय, ते प्रोबायोटिक्सने समृद्ध असते आणि शरीराला थंडावा देखील देते.

तीळाचे दूध

तीळ हे कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. तिळाचे दूध घरी सहज बनवता येते आणि हे पेय कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास मदत करते. एक कप तीळाच्या दुधात सुमारे 200-300 मिलीग्राम कॅल्शियम असते. याशिवाय, ते मॅग्नेशियम आणि झिंकमध्ये देखील समृद्ध असते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?