AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्ची पपई खाल्ल्यास ‘हे’ आजार तुमच्या जवळही येणार नाहीत, या 6 प्रकारे तुमच्या आहारात करा समाविष्ट

कच्ची पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तर ही कच्ची पपई तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता. काही दिवसांत तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. तर कच्च्या पपईचे सेवन केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतील तसेच तुम्ही तुमच्या आहारात कशाप्रकारे समाविष्ट करू शकतात ते जाणून घेऊयात...

कच्ची पपई खाल्ल्यास 'हे' आजार तुमच्या जवळही येणार नाहीत, या 6 प्रकारे तुमच्या आहारात करा समाविष्ट
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jun 24, 2025 | 2:54 PM
Share

प्रत्येक हंगामात निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आहाराची विशेष काळजी घेत असतो. यासाठी अनेकजण त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळे यांचा समावेश करतात. कारण या भाज्या व हंगामी फळे याच्या सेवनाने आपल्या शरीराला आवश्यक पोषण प्रदान करतात. अशी अनेक फळे आहेत जी कच्ची खाल्ली तरी फायदेशीर मानली जातात. जसे की केळी आणि पपई. तर आपल्या भारतीय स्वयंपाकघरात या दोन फळांपासून भाज्या देखील बनवल्या जातात.

अशातच कच्च्या पपईबद्दल बोलायचे झाले तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कारण या पपईच्या सेवनाने आपले पचन सुधारते. तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय कच्चा पपईत पपेन नावाचे एंजाइम असते जे पचनक्रियेला मदत करते तसेच शरीरातील जळजळ कमी करते. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्याला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. तसेच हे आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

जर तुम्ही तुमच्या आहारात कच्च्या पपईचा समावेश केला तर ते आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला कच्ची पपई खाण्याचे फायदे सांगणार आहोत. यासोबतच तुमच्या आहारात कच्ची पपई कशी समाविष्ट करू शकता हे देखील सांगणार आहोत चला सविस्तरपणे जाणून घेऊयात…

कच्ची पपई खाण्याचे फायदे

– कच्ची पपईच्या सेवनाने पचन सुधारते. गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम देण्यासाठी खूप प्रभावी आहे.

– कच्च्या पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपुर असते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होतात.

– कच्च्या पपईच्या सेवनाने शरीरातील जळजळ कमी होते. संधिवातासारख्या समस्यांपासून आराम मिळण्यासही उपयुक्त ठरते.

– तुम्ही योग्य प्रमाणात कच्च्या पपईचे सेवन केले तर तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता आणि वजन कमी करणे तुमच्यासाठी सोपे आहे.

– हाडे मजबूत करण्यासाठी देखील कच्ची पपईचे सेवन फायदेशीर ठरते.

– जर तुम्ही तुमच्या आहारात कच्च्या पपईचा समावेश केला तर तुमचे केस मजबूत होतात. तसेच, तुमचे केस जलद वाढतात.

– कच्ची पपई रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. मधुमेही रुग्णांनी कच्ची पपई त्यांच्या आहाराचा भाग बनवावे.

कच्ची पपई आहारात कशी समाविष्ट करावी?

तुम्ही कच्ची पपई सॅलडमध्ये मिक्स करून खाऊ शकता.

कच्च्या पपईपासून बनवलेला पराठाही चविष्ट लागतो.

तुम्ही कच्ची पपईची भाजीही बनवू शकता.

कच्च्या पपईचा रस देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

तुम्ही कच्च्या पपईचे लोणचे देखील बनवू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?