AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी शुगर टेस्ट करायची असेल तर औषध घ्यावं की नाही ?

ब्लड शुगर चेक करायची असेल तर बरेच लोक मधुमेहाचे औषध घेत नाहीत. औषध घेतल्याने शुगर लेव्हल नीट कळणार नाही, असं अनेकांना वाटतं तर बरेच लोक रात्री देखील औषध घेतात. पण टेस्टपूर्वी औषध घेणे योग्य की ते घेणं स्कीप करावं, चला जाणून घेऊया.

सकाळी शुगर टेस्ट करायची असेल तर औषध घ्यावं की नाही ?
ब्लड शुगर टेस्टImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 05, 2025 | 11:44 AM
Share

मधुमेह अर्थात डायबिटीस हा एक असा आजार आहे ज्यात अन्न, औषध आणि वेळेकडे खूप लक्ष द्यावे लागते. जर तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची तपासणी (ब्लड शुगर टेस्ट) करावी लागत असेल, तर रात्रीचं औषध घ्यावे की नाही हा एक मोठा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात गोंधळ असतो. जर औषध घेतले तर साखरेची पातळी कमी होऊ शकते आणि जर त्यांनी ते घेतले नाही तर साखरेची पातळी वाढू शकते किंवा अहवालावर परिणाम होऊ शकतो अशी शंका लोकांच्या मनात असते. अशा परिस्थितीत, चाचणीचा निकाल अचूक येण्यासाठी योग्य माहिती असणे खूप महत्वाचे आहे. चाचणी करण्यापूर्वी औषध घ्यावे की नाही हे डॉक्टरांकडून समजून घेऊया.

हेल्थलाइनच्या मते, जर तुम्ही दररोज मधुमेहाचे औषध घेत असाल, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषध घेणं थांबवू नये. औषध बंद केल्याने रात्री साखरेची पातळी खूप वाढू शकते किंवा काही केसेसमध्ये ती अचानक कमी देखील होऊ शकते, जे धोकादायक असू शकते. त्यामुळे टेस्ट करण्याच्या औषध घेणं बंद करू शकत नाही.

टेस्टचा उद्देश काय का ?

देशातील एका मोठ्या प्रयोगशाळेचे एमडी आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. समीर भाटी सांगतात की जेव्हा फास्टिंग ब्लड शुगर किंवा फास्टिंग प्लाज्मा ग्लूकोज (FPG) चाचणी केली जाते. औषधोपचार असूनही सकाळी तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कशी राहते हे जाणून घेणे हाँ त्याचा उद्देश असतो. त्यामुळे तुम्ही औषध घेणं थांबवलं तर त्या टेस्टचा काही अर्थच उरणार नाही. योग्य उपचारांसाठी, तुम्ही तुमचे नेहमीचे औषध घेणे आणि त्या आधारावर चाचणी करणे महत्वाचे आहे.

कधी करावी टेस्ट ?

डॉ. भाटी यांच्या सांगण्यानुसार, फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट ही 8 ते 10 तास उपवास केल्यानंतर सकाळी केली जाते. याचा अर्थ रात्रीचे जेवण केल्यानंतर, काहीही खाऊ नये, फक्त पाणी पिऊ शकता. सहसा सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान ही चाचणी करणे चांगले असते. या काळात, तुमची नैसर्गिक साखरेची पातळी कळते.

इन्सुलिन घेतात, त्यांनी काय करावं ?

जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही डोस चुकवू नका. रात्री साखर नियंत्रणात राहावी म्हणून काही इन्सुलिन रात्री दिले जाते. ते अचानक बंद केल्याने हायपरग्लाइसेमिया (साखर खूप जास्त वाढणे ) किंवा हायपोग्लाइसेमिया (खूप जास्त साखर) होऊ शकते.

डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा

प्रत्येक रुग्णाची परिस्थीती , आरोग्य वेगळं असतं. काहींची साखर जास्त असते तर काहींची ब्लड शुगर नियंत्रणात असते. तर काहींना औषधांसोबत इन्सुलिन दिले जाते. त्यामुळे, चाचणीपूर्वी औषध घ्यायचे की नाही याचा योग्य निर्णय फक्त डॉक्टरच घेऊ शकतात. तुम्ही स्वतःच अंदाज लावून एखादं औषध वगळणं हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला सकाळी तुमची साखरेची चाचणी करायची असेल तर रात्रीची औषधे वगळण्याची चूक करू नका. तुमचा सामान्य दिनक्रम आणि औषधे सुरू ठेवा, जेणेकरून चाचणीचा अहवाल योग्य येईल आणि डॉक्टर योग्य उपचार देऊ शकतील.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.