AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोंडाच्या समस्यांकडे दुर्लक्ष कराल तर वाढेल ‘या’ आजारांचा धोका…

तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक, मानसिक आरोग्यासोबतच मौखिक आरोग्याकडेही लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे. मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास, यातून गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण होत असतो. मौखिक आरोग्य चांगले नसेल तर, विविध प्रकारचे आजार निर्माण होउ शकतात, त्याबद्दल या लेखातून जाणून घेणार आहोत.

तोंडाच्या समस्यांकडे दुर्लक्ष कराल तर वाढेल ‘या’ आजारांचा धोका...
मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 12, 2022 | 10:58 AM
Share

निरोगी आरोग्य म्हटले म्हणजे पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ते, ह्रदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह यापासून मुक्त जीवन. हीच सर्वसाधारण व्यक्तीचे निरोगी जीवनाबद्दलची व्याख्या असते. परंतु या सर्वांप्रमाणे मौखिक आरोग्यदेखील (oral health) तेवढचं महत्वाच आहे, याकडे आपले नेहमी दुर्लक्ष होत असते. मौखिक आरोग्याकडे आपण नेहमी दुय्यम म्हणून बघत आलो आहे. यामुळे यातून अनेक आरोग्यविषयक समस्यांची निर्मित होत असते. विविध आरोग्य विमा (Health insurance) कंपन्यादेखील मौखिक आरोग्यविषयक आजारांना आपल्या विमा कवचमध्ये सहभागी करीत नसल्याचे दिसून येते. लोक अनेकदा, दातांच्या दुखण्याला, हिरड्यांच्या सुजेला तसेच तोंडात होत असलेल्या विविध त्रासावर घरगुती उपायांच्या (Home remedies) माध्यमातून त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करीत असतात. मौखिक आरोग्य चांगले नसल्यास यातून अनेक आजार निर्माण होउ शकतात.

ह्रदयविकार

ज्या लोकांना हिरड्यामध्ये बैक्टेरियांची समस्या असते, त्यांना ह्रदयविकाराचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. बैक्टेरिया ह्रदयांच्या ठोक्यांना प्रभावीत करीत असतात. त्यामुळे आधीच ह्रदयरोग असलेल्या लोकांसाठी बैक्टीरिया घातक ठरु शकतात. त्याच प्रमाणे अशा लोकांना ब्रेन स्ट्रोकचा धोकादेखील असतो. तज्ज्ञांच्या मते ब्लड सर्कुलेशन नीट होत नसल्याकारणाने याचा विपरित परिणाम हा मेंदूवर होत असतो. त्यामुळे अशा लोकांनी आपले दात आणि तोंडाच्या समस्यांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.

मधुमेह

तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना मधुमेह आहे, अशांना कुठल्याही तोंडाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा लोकांनी आपल्या तोंडाची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्‍यक आहे. मधुमेही लोकांच्या दातांतून रक्त येणे, हिरड्यांना सूज येणे, तोंडातून दुर्गंधी येणे आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा लोकांना तोंडाची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्‍यक आहे. तोंडाच्या आजारांमुळे व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढण्याचा धोका निर्माण होत असतो. दिवसातून किमान दोन वेळा दात घासणे अत्यंत आवश्‍यक आहे.

श्‍वास घ्यायला त्रास होणे

मौखिक आरोग्य योग्य नसले तर व्यक्तीला इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. त्यात, तोंडातून दुर्गंधी येणे, हिरड्या सुजने आदी लक्षणे सामान्य आहे. परंतु मौखिक आरोग्य चांगले नसले तर फुफ्फुसांचे कार्यदेखील मंदावत असते. त्यामुळे व्यक्तीला श्‍वास घेण्यास अडचणी निर्माण होउ शकतात. तज्ज्ञांच्या मते, याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे गंभीर आजारांचा सामनाही करावा लागू शकतो. त्याच प्रमाणे क्रोनिक निमोनियासारखे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

संबंधित बातम्या : 

वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर हा हर्बल चहा, जाणून घ्या ‘व्हाईट टी’बद्दल सविस्तर!

Weight Loss Tips : हीच ती योग्य वेळ वजन कमी करण्याची, अशा प्रकारे उन्हाळ्यात झटपट वजन कमी करा!

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.