तुम्हाला वारंवार विसरण्याची सवय आहे काय? ही अल्झायमरची लक्षणे तर नाही…

गेल्या काही वर्षांपासून ‘अल्झायमर’ या आजाराची रुग्ण वाढलेली दिसतात. आपल्या सर्वांसोबत असे बरेचदा घडते की आपण काही गोष्टी, काम विसरतो, परंतु असे सतत होत असेल तर आपण सावध व्हायला हवे, नेमक या आजाराची लक्षणे काय आहे, हे जाणून घ्याला हवे.

तुम्हाला वारंवार विसरण्याची सवय आहे काय? ही अल्झायमरची लक्षणे तर नाही...
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर मनीष कुमार यांच्याशी बातचीत करताना त्यांनी सांगितले की, पाणी हे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते तसेच अनेक आजारांपासून आपल्या शरीराचे रक्षण सुद्धा पाणी करते. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, थंडीच्या दिवसांमध्ये कमीत कमी रोज अडीच लिटर पाणी प्यायला हवे सोबतच डॉक्टरांनी अनेकांना सल्ला दिला आहे की रात्री झोपताना पाण्याचा एक ते दोन ग्लास नियमित पिऊनच झोपायला हवे त्यामुळे तुमचे शरीर व्यवस्थित राहते व शरीरामध्ये कोरडेपणा अजिबात जाणवत नाही.
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 11:25 AM

आयुष्य जगत असताना अशा अनेक व्याधी असतात, ज्याकडे आपले सर्रास दुर्लक्ष होत असते. परंतु भविष्यात याच व्याधी आपले आयुष्य मोठ्या प्रमाणात प्रभावीत करीत असतात. त्यामुळे त्यांच्या लक्षणांना वेळीच ओळखून त्यावर इलाज करणे महत्वाचे असते. प्रत्येक समस्येचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, त्यापैकी एक म्हणजे विसरण्याची सवय. विसरणे ही तुमची सवय किंवा आजार आहे हे तुम्हाला समजले पाहिजे. आपल्या सर्वांसोबत असे बरेचदा घडते की आपण काही गोष्टी, काम इत्यादी विसरतो, परंतु असे सतत होत असेल तर आपण सावध व्हायला हवे. वास्तविक, या धावपळीच्या जीवनात ‘अल्झायमर’चा (Alzheimer) धोका (dangerous) दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत, अल्झायमर टाळण्यासाठी, शेवटी काय होते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ‘अल्झायमर’ हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे, त्‍यामुळे त्रस्‍त रुग्णाची स्मरणशक्ती हळूहळू कमकुवत (forgetfulness) होते. ज्याचा त्याच्या जीवनाच्या कार्यावर परिणाम होतो. बहुतेक ते मध्यम वयात किंवा वृद्धापकाळात मेंदूच्या ऊतींचे नुकसान झाल्यामुळे होते. हा स्मृतिभ्रंशाचा सर्वात सामान्य प्रकार मानला जात असला तरी, जो व्यक्तीची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता, दैनंदिन क्रियाकलापांवर परिणाम करतो. तरुणांमध्येही या आजाराचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.

मन गुंतवून ठेवा

जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपले मन रिकामे ठेवू नका, नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा. नवीन गोष्टी शिकले पाहिजे. मन पूर्णपणे सक्रिय ठेवा. याच्या मदतीने तुम्ही या आजारापासून दूर राहू शकता. सतत काही तरी कामात स्वत:ला गुंतवल्यास या आजारापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते.

मद्यपान टाळा

‘अल्झायमर’पासून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक लोक मद्यपान करीत असतात. परंतु त्याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. या आजारावर मात करण्यासाठी सर्व प्रकारच्या अमली पदार्थांपासून दूर राहावे आणि आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या आणि सुक्या मेव्याचा समावेश करावा.

तणावापासून दूर रहा

नेहमी तणावमुक्त जीवन जगले पाहिजे. स्वतःला कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर ठेवावे. घटस्फोट, एखाद्याचा मृत्यू किंवा नोकरी गमावणे इत्यादीमुळे लोक तणावात जात असतात. इतकंच नाही तर यामुळे महिलांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याचा आणि अल्झायमर रोगाचा धोका वाढतो, स्वत:ला तणावापासून दूर ठेवल्यास अल्झायमरपासून आपला बचाव होउ शकतो

पुरेशी झोप घ्या

झोप न लागण्याची अनेकांची समस्या असते. ज्याचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो, त्यामुळे नियमित पुरेशी झोप घेणे आवश्‍यक आहे. तुम्ही मोबाईलमध्ये व्यस्त असाल तर तुमच्या आप्तेष्टांशी बोलण्यात आपले मन गुंतवले पाहिजे, चांगल्या गोष्टींचे स्मरण करुन तणावापासून दूर राहता येते.

ही आहेत अल्झायमरची लक्षणे

संशोधकांच्या मते, अल्झायमर आजारामध्ये मेंदूला जागृत ठेवणारे मेंदूचे भाग कमकुवत होतात. यामुळेच माणसाला विसरण्याची सवय लागते जी अल्झायमरचे रूप घेते. या आजाराने ग्रस्त रुग्ण दिवसा जास्त झोपू लागतात. एवढेच नाही तर मेंदूचे जे भाग आपल्याला दिवसा जागृत ठेवतात ते ताऊ (Tau) नावाच्या प्रोटीनमुळे खराब होतात, जे अल्झायमर रोगातही मोठी भूमिका बजावतात.

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....