चमकदार त्वचेसाठी करा Lemon Balm चा वापर, फायदे वाचून व्हाल हैराण

आपल्यापैकी अनेक जणांना लेमन बाम बद्दल माहीत नसेल. मात्र त्यामध्ये अँटी-एजिंग आणि डीप क्लींजर सारखे अनेक गुणधर्म आहेत.

चमकदार त्वचेसाठी करा Lemon Balm चा वापर, फायदे वाचून व्हाल हैराण
चमकदार त्वचेसाठी करा Lemon Balm चा वापर, फायदे वाचून व्हाल हैराण Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 3:51 PM

नवी दिल्ली: तुम्हाला जर कोणी सांगितलं की लेमन बाम हे (lemon balm) तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर (benefits) आहे, तर तुमचा कदाचित त्यावर विश्वास बसणार नाही. बहुतांश लोकांना लेमन बाम बद्दल माहितीच नसते. लेमन बामचा उपयोग हा आपल्या त्वचेच्या (skin problems) उद्भवणाऱ्या समस्यांसदर्भात केला जातो.

लेमन बाममध्ये लिंबासारखा सुगंध असतो. याच्या रोपाचे वैज्ञानिक नाव मेलिसा ऑफिसिनेलिस असे आहे. त्याच्या पानांचा रंग पिवळा किंवा गडद हिरवा असतो. लेमन बाम हे आपल्या त्वचेसाठी कसे फायदेशीर असते, याची माहिती जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

त्वचेसाठी फायदेशीर लेमन बाम

आपल्या त्वचेसंदर्भात उद्भवलेल्या समस्यांपासून आराम मिळवायचा असेल तर लेमन बाम हे अतिशय गुणकारी मानले जाते. त्याचे फायदे जाणून घेऊया.

अँटी- ॲक्ने

लेमन बाममधील अँटी- बॅक्टेरिअल आणि इन्फ्लामेटरी गुणधर्म हे आपल्या त्वचेचा लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करतात. त्याचा कूलिंग इफेक्ट हा मुरुमे किंवा पिंपल्स आलेल्या त्वचेवर प्रभावी ठरतो. विशेष म्हणजे, लेमन बाम हे आपल्या त्वचेला आतून आणि बाहेरून, दोन्हीकडून सुधारते. तुमची त्वचा ऑईली असेल तर तुम्ही स्किन केअर रूटीनमध्ये लेमन बामचा नियमित वापर करू शकता.

अँटी- एजिंग

लेमन बाममध्ये अँटी-एजिंग तत्वही उपलब्ध असतात. ती त्वचेला पुनरुज्जीवित करण्यास मदत करतात. लेमन बाम हा आपली त्वचा चमकदार बनवणे आणि काळे डाग दूर करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्याचा वापर केल्याने आपल्या त्वचेला नैसर्गिक चमकही मिळेल.

सनस्क्रीन

लेमन बाममध्ये कॅफिक आणि रोझमॅरिनिक ॲसिड असते. त्यामुळे त्याचा सनस्क्रीन म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. त्वचेचे UV किरणांमुळे होणारे नुकसान अथवा हानीपासून बचाव करण्यासाठी लेमन बाम हे प्रभावी ठरते.

डीप क्लीन्जर

तसं पहायला गेलं तर लेमन बामचे अनेक फायदे आहेत. ते त्वचेची छिद्र साफ करते, त्यासह ब्लॅकहेड्स आणि व्हाईडहेडसपासून मुक्ती मिळवण्यातही मदत करते. खरं सांगायचं तर लेमन बाम हे आपल्या त्वचेसाठी डीप क्लीन्जर म्हणून काम करते. त्याशिवाय, तुम्हाला जर एखादा डास किंवा कीडा चावला असेल तर प्रभावित जागी लेमन बामची पाने तुम्ही लावू शकता.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.