Walnut Benefits: मेंदू आणि हृदयाचा सुपरफूड म्हणजे अक्रोड, खाये तो जाने!

| Updated on: Sep 22, 2022 | 3:57 PM

ज्या व्यक्ती लहानपणापासूनच अक्रोड खाण्यास सुरुवात करतात, त्यांच्यावर याचा चांगला परिणाम दिसून येतो. त्यांच्या खाण्याच्या सवयी सुधारतात, शरीराचा फिटनेस चांगला राहतो.

Walnut Benefits: मेंदू आणि हृदयाचा सुपरफूड म्हणजे अक्रोड, खाये तो जाने!
मेंदू आणि हृदयाचा सुपरफूड म्हणजे अक्रोड, खाये तो जाने!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: अक्रोड (walnut) हे एक असे ड्रायफ्रुट (dry fruit) जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दररोज अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारक (immunity) शक्ती मजबूत होते, हृदयाशी संबंधित (heart) आजारांच्या जोखमी पासून संरक्षण करते आणि त्याच वेळी मेंदूही (brain) तल्लख होतो व सक्रिय राहतो. अक्रोडामुळे पचन संस्थेचे कार्यही सुरळीत राहते. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, अक्रोडमध्ये अनेक पोषक तत्वं असतात. ते पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्सचा एक प्रमुख स्त्रोत आहे. एका संशोधनानुसार, अक्रोडचे सेवन करणे हे आपल्या निरोगी जीवनशैलीसाठी खूप महत्वाचे आहे. जाणून घेऊया अक्रोड खाण्याचे फायदे..

आरोग्य आणि वयावर होणारा परिणाम

संशोधकांच्या मतानुसार, दररोज अक्रोडचे सेवन केल्याने शरीराची रचना आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एपिडेमिओलॉजी अँड कम्युनिटी हेल्थ विभागात अक्रोडवर संशोधन करताना तज्ज्ञांनी त्याचा आपल्या वयावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तज्ज्ञांना असे आढळले की ज्या लोकांनी लहान वयात अक्रोडचे सेवन करण्यास सुरवात केली त्यांच्या शरीराची रचना चांगली होती. तसेच त्यांना रोग होण्याची किंवा ते आजारी पडण्याची शक्यताही कमी होती.

अक्रोडच्या सेवनाचे फायदे

– आपला मेंदू वेगाने काम करतो. त्यामुळे आपली आयुमर्यादा वाढण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

– अक्रोड टाइप -2 मधुमेहाचा धोका कमी करते

– इतर ड्रायफ्रूटच्या तुलनेत अक्रोड देखील ओमेगा 3 चा एक प्रमुख स्रोत आहे, जो हृदयासाठी उपयुक्त मानला जातो.

– अक्रोड अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात, जे आरोग्य आणि दीर्घायुष्यात योगदान देतात. त्यामध्ये फायबर, मॅंगनीज, मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6, फॉलेट आणि थियामीन सारखी पोषक तत्वे असतात.

भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे

– कॅन्सरचा धोका कमी होतो.

– बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

– भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

– मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

– तणाव कमी होण्यास मदत होते.

– तसेच वजन कमी होण्यास मदत होते.

तज्ज्ञांच्या मते, ज्या व्यक्ती लहानपणापासूनच अक्रोड खाण्यास सुरुवात करतात, त्यांच्यावर याचा चांगला परिणाम दिसून येतो. त्यांच्या खाण्याच्या सवयी सुधारतात, शरीराचा फिटनेस चांगला राहतो. आयुमर्यादा वाढण्यास मदत होते.