AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : आजारी कमी पडायचंय? मग सकाळी करा पोटभर नाश्ता, मिळतो आरोग्याला फायदा

दिवसाची सुरूवात पोटभर आणि पौष्टिक नाश्त्याने केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अनेक आजारापासून शरीराचा बचाव होतो.

Health Tips : आजारी कमी पडायचंय? मग सकाळी करा पोटभर नाश्ता, मिळतो आरोग्याला फायदा
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 27, 2023 | 12:40 PM
Share

नवी दिल्ली – सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी (breakfast) खूप महत्त्वाचा आहे. शरीरासाठी पौष्टिक आहार जेवढा आवश्यक आहे, तेवढेच महत्वाचे आहे वेळेवर खाणे. सकाळी उठून आवरणे, ऑफीसला जायची गडबड या सगळ्या नादात अनेक लोकं नाश्ता करायला विसरतात. तर अनेकांना सकाळचा नाश्ता करण्याची सवयच नसते. अशा स्थितीत व्यस्त जीवनशैली आणि खाण्याच्या योग्य सवयींचा (busy lifestyle and unhealthy food habits) अभाव यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. बर्‍याचदा घरातील वडीलधारी मंडळी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असल्याचे सांगतात. काही खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. पण सकाळचा नाश्ता करणं का गरजेचं आहे किंवा जेवल्यानंतरच घराबाहेर पडण्यामागचं कारण काय आहे, याबद्दल लोकांना नीट माहिती नाही. सकाळी पोटभर नाश्ता करण्याचे काय फायदे (benefits of breakfast) आहेत, ते जाणून घेऊया.

सकाळी नाश्ता करण्याचे फायदे

निरोगी हृदयासाठी महत्वाचा ठरतो नाश्ता

एका अभ्यासानुसार, नाश्ता वगळल्याने तुमचे वजन जास्त वाढू शकते. जास्त वजन किंवा लठ्ठपणा असल्याने उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे निरोगी हृदय हवे असेल तर नाश्ता करणे विसरू नका.

टाइप-2 मधुमेहाचा धोका होतो कमी

नियमित नाश्ता केल्याने मधुमेहापासून अंतर राखता येते. एका अभ्यासानुसार, जे लोक नियमित नाश्ता करतात त्यांना मधुमेहाचा धोका जवळपास 30% कमी होतो.

ऊर्जेची पातळी वाढवते

नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. पौष्टिक आहार घेऊन सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर शारीरिक हालचालींमध्ये वाढ होते. लवकर भूक लागत नाही आणि दिवसभर भरपूर ऊर्जा राहते. तसेच गतिशील राहिल्याने वजन नियंत्रणात राहते आणि थकवा येत नाही

स्मृती सुधारते

पौष्टिक नाश्ता करून दिवसाची सुरुवात केल्याने एकाग्रता वाढू शकते आणि स्मरणशक्ती वाढू शकते. मेंदूच्या निरोगी कार्यासाठी कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात. अशा स्थितीत उच्च दर्जाचा नाश्ता केल्याने तणाव कमी होऊन मन शांत राहू शकते.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.