‘हे’ आरोग्यदायी पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम, जाणून घ्या
आजकाल सोशल मीडियावर अनेक खाद्य पदार्थांबद्दल भरपूर व्हिडिओ व्हाअरल होत असतात, परंतु त्या सर्वच गोष्टी तुमच्यासाठी आरोग्यासाठी योग्य असतीलच असे नाही. काही निरोगी पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक देखील ठरू शकतात. यामागील कारण म्हणजे ते खाण्याची चुकीची पद्धत. चला याबद्दल सेलिब्रिटी पोषणतज्ञ काय सांगितले आहे ते जाणून घेऊयात.

रोजच्या धावपळीत आणि कामाच्या ताणतणावात आपण आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाही. त्यामुळे आपण या व्यस्त जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांनी समृद्ध आहाराचा आपण सेवन करत असतो. परंतु हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की सर्वकाही आरोग्यदायी पदार्थ प्रत्येकासाठी आरोग्यदायी ठरतील असे नाही. आजकाल लोकं सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करताना पाहिला मिळतात, पण ही लोकांची सर्वात मोठी चूक आहे. कारण अन्नापदार्थांच्या बाबतीत प्रत्येक ट्रेंडमध्ये असलेला पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल हे सांगता येत नाही. काही लोकं अनेकदा सोशल मीडियावर हे पदार्थ आरोग्यदायी आहे असे सुचवताना दिसतात. मात्र हे पदार्थ जर चुकीच्या पद्धतीने सेवन केले तर ते तुमच्या आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान पोहोचवू शकतात.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी सांगितले आहे की “जरी एखादा पदार्थ सोशल मिडियावर खूप लोकप्रिय असला तरी तो पोषण तज्ञ म्हणून काही विशिष्ट पदार्थ खाण्याची किंवा टाळण्याची शिफारस करत नाही. फक्त काहीतरी एखादा पदार्थ ट्रेंडिंग आहे याचा अर्थ असा नाही की ते तुमच्या पोटासाठी, हार्मोन्ससाठी किंवा पचनासाठी चांगले आहे.
सध्या डिजिटल युगात अनेक गोष्टी लोकप्रिय होत आहेत. तर ही बाब लक्षात घेता पोषतज्ञांनी कोणते आरोग्यदायी पदार्था आहेत जे तुम्ही चुकून चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. चला तर याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.
निरोगी स्मूदी पण चुकीच्या पद्धतीने
दही, फळं आणि नट्स वापरून एक आरोग्यदायी स्मूदी बनवली जाते, ज्यामुळे ते एक उत्तम आरोग्यदायी पेय बनते. बरेच लोकं नाश्तात दररोज सकाळी स्मूदी पितात, परंतु त्यांची एक चूक म्हणजे स्मुदी थंड पिणे. तुम्ही जर थंड स्मूदी प्यायलात तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण थंड स्मूदी ऊर्जा देण्याऐवजी अशक्तपणा आणि पचन आणि हार्मोन्सवर प्रतिकूल परिणाम करू शकते.
मल्टीग्रेन पिठाची रोटी
आपण प्रत्येकजण गव्हाच्या पिठाची चपाती बनवून खात असतो. पण वाढत्या खाण्याच्या ट्रेंडनुसार तुम्हाला सोशल मीडियावर वेगवेगळ्या धान्यांच्या पीठापासून तयार केलेल्या रोट्या आरोग्यासाठी किती फायदे प्रदान करते असे सांगणारे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील परंतु ते सर्वांसाठी फायदेशीर असतीलच असे नाही. तर अनेक वेगवेगळ्या पीठापासून तयार केलेल्या रोट्या किंवा पोळ्या काही लोकांसाठी पोटफुगी आणि जडपणा अशा समस्या निर्माण होऊ शकतो
चुकीच्या पद्धतीने सॅलड खाण्याचे परिणाम
जेवणासोबत सॅलड खाणे फायदेशीर मानले जाते. भारतात, बहुतेक कच्च्या भाज्या थेट सॅलड म्हणून खाल्ल्या जातात, ज्यामुळे आरोग्याला भरपूर पोषक तत्वे मिळतात. मात्र तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्री सॅलड खाणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. रात्री कच्चे सॅलड खाल्ल्याने तुमचे आतडे खराब होऊ शकतात आणि तुमची झोप बिघडू शकते.
तूप टाळणे
आजकाल फिटनेसच्या नावाखाली लोक घरगुती तूप खाणे टाळतात. जर तुम्ही हा ट्रेंड फॉलो केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला घरगूती तूपातील चांगल्या फॅटची आवश्यकता आहे, म्हणून ते पूर्णपणे वगळणे किंवा जास्त प्रमाणात खाणे टाळा. तुमच्या आहारात संतुलित पद्धतीने घरगूती तूप समाविष्ट करणे फायदेशीर आहे.
सेलिब्रिटी पोषणतज्ञ
श्वेता शहा या एक सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आहे आणि त्यानी कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींना त्यांच्या डाएट मध्ये मदत केली आहे. तसेच त्या महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत सारख्या खेळाडूंसाठी आहार तज्ञ देखील आहेत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
