AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालाही झालाय का Eating Disorder? ही लक्षणे दिसत असतील तर व्हा सावध

इटिंग डिसऑर्डर असलेला रुग्ण कधी गरजेपेक्षा जास्त अन्न खातो किंवा कधी इतके कमी सेवन करतो की त्याचा जीव धोक्यात येऊ लागतो.

तुम्हालाही झालाय का Eating Disorder? ही लक्षणे दिसत असतील तर व्हा सावध
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 02, 2023 | 9:27 AM
Share

नवी दिल्ली : आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, जे एकतर खूप अन्न खातात किंवा खूप कमी खातात. वास्तविक, खाण्यापिण्याचा विकार (Eating Disorder)हा एक गंभीर प्रकारचा मानसिक आजार आहे. खाण्याच्या विकाराच्या समस्येचा सामना करणार्‍या रूग्णांना खाण्याच्या अनियमित सवयी (food habits) किंवा त्यांचे वजन आणि आकार (concerned about weight) याबद्दल जास्त काळजी असल्याचे समोर आले आहे. इटिंग डिसऑर्डर असलेली व्यक्ती कधीकधी भरपूर अन्न खाते, तर कधी इतके कमी पदार्थ खाते की त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

चिंताजनक बाब म्हणजे अन्नाशी संबंधित हा विकार आयुष्यात कधीही होऊ शकतो. पण, बहुतेक प्रकरणांमध्ये हा आजार लहान वयात विकसित होतो. इटिंग डिसऑर्डरची लक्षणे आणि परिस्थितीच्या आधारे या रोगावर उपचार करणे पूर्णपणे शक्य आहे. इटिंग डिसऑर्डरची लक्षणे काय आहेत आणि तो का होतो, याची कारणे जाणून घेऊया…

Eating Disorder ची लक्षणे :

– वजन कमी होणे, वजन वाढणे किंवा जलदरित्या वजन कमी-जास्त होणे

– शरीराचे वजन किंवा बांधणीकडे गरजेपेक्षा जास्त लक्ष देणे

– थंडीसाठी संवेदनशील असणे

– बेशुद्ध होणे, थकवा आणि चक्कर येणे

– जलद मूड स्विंग आणि चिडचिड

– समाजापासून लांब राहणे

– चिंता आणि नैराश्य

– एखादा विचार करणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे

Eating Disorder का होतो ? काय आहेत त्याची कारणे ?

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ईटिंग डिसऑर्डर नेमका का होतो, त्याची कारणे काय आहेत हे अद्याप नीटपणे कळू शकलेले नाही. तज्ञांचे असे मत आहे की अनेक फॅक्टर्स एकत्र आल्यामुळे ईटिंग डिसऑर्डरचा आजार होऊ शकतो. या घटकांमध्ये सामाजिक, मानसिक आणि जैविक घटकांचा समावेश होतो. वेगवेगळ्या लोकांमध्ये या समस्येचे प्रमाण देखील भिन्न असू शकते.

कसा होतो Eating Disorder वर उपचार ?

ईटिंग डिसऑर्डर या विकारावर अनेक उपचार आणि थेरपी उपलब्ध आहेत. पण हा आजार असलेल्या प्रत्येक रुग्णाच्या समस्यांमध्ये खूप फरक असू शकतो, हे लक्षात ठेवणे महत्वाचे ठरते. त्यामुळेच व्यक्तीनुसार, त्याच्या उपचार पद्धती बदलू शकतात. कारण या आजाराचा रुग्णाच्या शरीरावर परिणाम तर होतोच पण त्याच्या मनावरही त्याचा प्रभाव पडतो.म्हणूनच या आजाराच्या उपचारासाठी डॉक्टर औषधांबरोबरच ध्यान (मेडिटेशन) आणि योगासने करण्याचा सल्ला अनेकवेळा देतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.