AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बरं नाहीये ? म्हणजे नक्की काय होतं? जाणून घ्या आपण नेमके आजारी कसे पडतो ?

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जेव्हा आपल्या शरीरावर विषाणू, बॅक्टेरिया किंवा विषारी पदार्थांचा हल्ला होतो तेव्हा आपण आजारी पडतो.

बरं नाहीये ? म्हणजे नक्की काय होतं? जाणून घ्या आपण नेमके आजारी कसे पडतो ?
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 08, 2023 | 12:25 PM
Share

नवी दिल्ली – आपण कधी पाहिलं असेल की आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे नेहमी आजारी (sick) पडतात. त्यांचा आजार जीवघेणा नसतो, पण त्यांना सर्दी, खोकला, ताप छोट्या आजारांनी नेहमीच घेरलेले असते. असं का होतं, आपण नेमके आजारी का पडतो, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? हेच जाणून(bacteria)  घेण्याचा प्रयत्न करूया. एखाद्या व्यक्तीला आजारी पाडणारे मुख्य घटक कोणते ? तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपल्या शरीरावर विषाणू, बॅक्टेरिया किंवा विषारी पदार्थांचा हल्ला होतो तेव्हा आपण आजारी (falling sick  पडतो. त्यामुळे आपल्याला ताप येणे, सर्दी- खोकला, थकवा येणे आणि अंगदुखी,स्नायू दुखी अशी लक्षणे पहायला मिळतात किंवा असा त्रास होतो.

रोगप्रतिकारक शक्ती काय करते ?

या बाहेरील विषारी घटकांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असते. पण काहीवेळा रोगप्रतिकारक प्रणाली ते (बॅक्टेरिया) हाताळू शकत नाही, आणि आपण आजारी पडतो. तसेच तणाव, झोपेची कमतरता खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पुरेसे पोषण न मिळणे, यामुळे देखील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते व रोगाचा धोका वाढू शकतो.

या कारणांमुळेही तुम्ही आजारी पडू शकता.

पर्यावरणातील प्रदूषण, आनुवंशिकता आणि कोणत्याही आजारावर योग्य उपचाराचा अभाव हेही यामागचे कारण असू शकते. त्याव्यतिरिक्त, धूम्रपान, जास्त मद्यपान करणे आणि खराब जीवनशैली या अशा अयोग्य सवयींमुळेदेखील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते व रोगाचा धोका वाढू शकतो.

ही असतात आजारपणाची लक्षणे –

– ताप येणे

– खोकला

– थकवा

– शरीरात वेदना

– डोकेदुखी

– गळा खराब होणे

– वाहणारे नाक

– उलटी होणे

– जुलाब होणे

– श्वास घेण्यास त्रास होणे

– छातीत वेदना होणे

– गोंधळल्यासारखे वाटणे

रोग टाळण्यासाठी काय करावे ?

आजारी पडू नये म्हणून तुम्ही काही पावले उचलू शकता.

1) आपले हात वारंवार धुवावेत : रोगाचा प्रसार रोखण्यासाठी हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. आपले हात साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद धुवा, विशेषत: बाथरूम वापरल्यानंतर, नाक शिंकरल्यानंतर किंवा खाण्यापूर्वी हात आवर्जून धुवावेत.

2) खोकताना आणि शिंकताना घ्या काळजी : खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक रुमालाने झाका आणि वापरलेला रुमाल स्वच्छ धुवा. तुमच्याकडे रुमाल किंवा टिश्यू नसल्यास, खोकताना किंवा शिंकताना कोपराचा वापर करा.

3) आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा : आजारी असलेल्या लोकांपासून कमीतकमी 6 फूट अंतर राखण्याचा प्रयत्न करा, विशेषत: त्यांना सर्दी, फ्लू किंवा इतर आजार असल्यास लांब रहावे.

4) वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू स्वच्छ करा : घरातील साफसफाईसाठी वाइप्सचा वापर करून डोअनॉब, लाईट स्विचेस आणि कीबोर्डसारख्या गोष्टी स्वच्छ करा. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल किंवा एखादी आजारी व्यक्ती घरी आली असेल तर हे आवर्जून करा. कारण रोग निर्माण करणारे बॅक्टेरिया या ठिकाणी सर्वाधिक आढळतात.

5) निरोगी व पौष्टिक आहार घ्या आणि हायड्रेटेड रहा : फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि हलके प्रथिने असलेला समृध्द आहार मजबूत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतो. तसेच दिवसभरात भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहणेही महत्त्वाचे आहे.

6) नियमित व्यायाम करा : व्यायामामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि रोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. आठवड्यातील सर्व दिवस कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा.

7) तणाव दूर करा : तणावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते, त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही योगासने, मेडिटेशन किंवा प्राणायाम शिकू शकता.

8) पुरेशी झोप घ्या : प्रत्येक व्यक्तीने किमान 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. कारण झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते आणि आजाराचा धोका वाढू शकतो.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.