AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांना ‘या’ कारणामुळे होतो गुडघेदुखीचा त्रास, जाणून घ्या बचावाचे उपाय

बऱ्याचदा लोकं गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करतात, मात्र भविष्यात हा त्रास अधिक वाढून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

महिलांना 'या' कारणामुळे होतो गुडघेदुखीचा त्रास, जाणून घ्या बचावाचे उपाय
| Updated on: Nov 17, 2022 | 11:06 AM
Share

नवी दिल्ली – आजकाल बऱ्याच महिला या गुडघेदुखीच्या (knee pain) समस्येमुळे त्रस्त असतात. आधुनिक, व्यस्त जीवनशैली, व्यायामाच अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे यामागचे मुख्य कारण ठरू शकते. स्नायू आखडणे आणि सांधेदुखीमुळे (joint pain) लोकांना रात्रभर त्रास होऊ शकतो. मात्र बऱ्याचदा लोकं याकडे दुर्लक्ष करतात, मात्र भविष्यात हा त्रास अधिक वाढून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामागचे कारण काय (causes) व त्यापासून बचाव कसा करता येईल हे जाणून घेऊया.

पुरूषांपेक्षा महिलांना ‘या’ कारणामुळे गुडघेदुखीचा होतो जास्त त्रास

– महिलांची शारीरिक जडणघडण अशी असते की त्यांच्या सांध्याची हालचाल अधिक होतेच तसेच त्यांचे लिगामेंट्स हेही अधिक लवचिक असतात. ज्यामुळे त्यांची गुडघ्यांची हालचाल अधिक होते. त्यामुळेच गुडघेदुखीचा त्रास अधिक होण्याची शक्यता वाढते.

– गुडघे निरोगी रहावेत यासाठी महिलांमधील एस्ट्रोजन हे हार्मोन महत्वपूर्ण भूमिका निभावते. मात्र मासिक पाळीच्या दरम्यान व मेनोपॉज नंतर एस्ट्रोजन हार्मोनची पातळी कमी होते. हा स्तर कमी झाल्याने गुडघ्याच्या सांध्याना सपोर्ट करणाऱ्या कार्टिलेजवर परिणाम होतो.

– अधिक वजन : पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या अधिक जाणवते. अधिक वजनामुळे गुडघ्यांवर दाब पडून ते खराब होतात व त्यांच्यामध्ये वेदना सुरू होतात. तुमचे वजन जितके अधिक त्यापेक्षा पाचपट दाब हा गुडघ्यांवर येतो व गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो.

– गुडघ्यात होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्यानेही हा त्रास अधिक वाढू शकतो. गुडघे सतत दुखत असतील, त्यांना सूज येत असेल किंवा वेदना होत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अन्यथा हा त्रास अधिक वाढून भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात.

– गुडघ्याला काही लागले, वेदना झाल्या तर त्यावर त्वरित उपचार करावेत. वेळीच उपचार न केल्यास भविष्यात वेदना वाढून गुडघ्यांचे अपरिमित नुकसान होऊ शकते.

– गरजेपेक्षा अधिक व्यायाम करणे हेही आपल्या गुडघ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. जास्त व्यायाम तसेच धावल्याने नी-कॅप व टेंडनवर अधिक दाब पडून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

अशी घ्या काळजी

1) वजन नियंत्रणात ठेवा

वर नमूद केल्याप्रमाणे वजन वाढल्यामुळेही गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. शरीराच्या अतिरिक्त वजनाचा गुडघ्यावर खूप दाब पडतो. त्यामुळे गुडघ्याची काळजी घ्यायची असेल तर आपल्या वजनावरही नियंत्रण ठेवावे.

2) लो इम्पॅक्ट व्यायाम करावा

गुडघ्यांच्या कार्टिलेजचे संरक्षण करण्यासाठी पोहणे, सायकल चालवणे हे व्यायाम फायदेशीर ठरतात. त्याशिवाय भविष्यात (गुउडघ्यांचे) होणारे नुकसान कमी करण्यासाठीही हे व्यायाम उपयोगी ठरतात.

3) अति उत्साह टाळा

झुंबा डान्स, उड्या मारणे, बसणे, वेगाने मागे-पुढे होणे यासारखे व्यायाम तसेच काही योगासने यामुळे गुडघ्यांच्या वेदना अथवा त्रास वाढू शकतो. त्यामुळे हे व्यायाम प्रकार करताना सावध रहावे,

4) वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

गुडघ्यांमध्ये वेदना होणे, ते सुजणे असा त्रास जाणवत असेल तर वेळ न घालवत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. गुडघेदुखीकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळेवर उपचार करावेत अन्यथा हा त्रास अधिक वाढू शकतो.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.