लहान मुलांच्या यकृतावर हल्ला करणाऱ्या एका खतरनाक रोगाबद्दल WHO ने दिला इशारा, जाणून घ्या याची लक्षणे!

| Updated on: Apr 25, 2022 | 3:36 PM

WHO ने या नवीन आजारामुळे मुलांवर आणि त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या लक्षणांवर विशेष लक्ष देत खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. एकूण बारा देशांमध्ये हिपॅटायटीसच्या 169 केसची नोंद करण्यात आली आहे. धोक्याची घंटा म्हणजे या आजारामध्ये एका लहान मुलांचा मृत्यू देखील झाला आहे. यूएन म्हटले आहे की, लहान मुलांमध्ये तीव्र हिपॅटायटीस, यकृतामध्ये जळजळ याच्या 169 दुर्मिळ केस समोर आल्या आहेत.

लहान मुलांच्या यकृतावर हल्ला करणाऱ्या एका खतरनाक रोगाबद्दल WHO ने दिला इशारा, जाणून घ्या याची लक्षणे!
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले होते. अजूनही कोरोना (Corona) गेला नाहीये. भारतामध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. विशेष म्हणजे यावेळी कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना (Children) अधिक प्रमाणात होतो आहे. यामुळे पालक चिंतेत आहेत. आता पालकांची चिंता वाढवणारी आणखीन एक बातमी पुढे येते आहे. एक महिना ते 16 वर्षांच्या मुलांमध्ये यकृताच्या (Liver) गंभीर समस्या निर्माण होत आहेत. धोकादायक म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराविषयी चिंता व्यक्त करत धोक्याचा इशारा देखील दिला आहे. हा जो नवीन आजार आहे, तो जवळपास 12 देशांमधील मुलांमध्ये दिसून आला आहे.

WHO ने दिला धोक्याचा इशारा

WHO ने या नवीन आजारामुळे मुलांवर आणि त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या लक्षणांवर विशेष लक्ष देत खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. एकूण बारा देशांमध्ये हिपॅटायटीसच्या 169 केसची नोंद करण्यात आली आहे. धोक्याची घंटा म्हणजे या आजारामध्ये एका लहान मुलांचा मृत्यू देखील झाला आहे. यूएन म्हटले आहे की, लहान मुलांमध्ये तीव्र हिपॅटायटीस, यकृतामध्ये जळजळ याच्या 169 दुर्मिळ केस समोर आल्या आहेत. या आजारामध्ये 17 मुले इतके जास्त सिरिअस आहेत की, त्यांना यकृत प्रत्यारोपणाची गरज आहे.

ही आहेत प्रामुख्याने लक्षणे

जागतिक आरोग्य संघटनेने पालकांना त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. जर मुलांना पोटदुखी, अतिसार, उलट्या आणि यकृतामध्ये जळजळ होत असेल तर आरोग्य केंद्रांना याबद्दल माहिती देणे महत्वाचे आहे. ज्या मुलांना हा आजार झाला त्यांना ताप मात्र अजिबात नव्हता. या गंभीर आजाराची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत, अतिसार, उलट्या, मळमळ, सांधे दुखी, थकवा, भूक न लागणे, पिवळी लघवी हे मुख्य लक्षणे आहेत. यूकेमध्ये याच्या 114 केसेस आहेत. तर अमेरिका, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड्स, इटलीमध्ये देखील काही मुलांना याची लागण झाल्याचे कळते आहे. या संदर्भात india.com ने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

संबंधित बातम्या : 
Weight Loss | डिटॉक्स ड्रिंक्सने वजन झपाट्याने कमी करा, जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!

Health Care Tips : दिवसभर फ्रेश आणि निरोगी राहण्यासाठी या 4 पेयांचे नक्की सेवन करा!