Weight Loss | डिटॉक्स ड्रिंक्सने वजन झपाट्याने कमी करा, जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!

हे खास पेय बनवण्यासाठी काकडीचे पातळ तुकडे करून ते पाण्याच्या भांड्यात टाका. त्यात लिंबाचे पातळ काप आणि काही पुदिन्याची पाने टाका, हे पाणी फ्रीजमध्ये रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सेवन करा. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळते. शिवाय आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळे या पेयाचे या हंगामामध्ये आहारात नक्कीच समावेश करा.

Weight Loss | डिटॉक्स ड्रिंक्सने वजन झपाट्याने कमी करा, जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 2:34 PM

मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये लोक निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये थंड पेयांचा समावेश करतात. हे पेय थंड होण्यास आणि शरीराला हायड्रेट (Hydrate) ठेवण्यास मदत करतात. याशिवाय तुम्ही काही हेल्दी ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकता. हे लिंबू, पुदिना, काकडी यांसारखे पदार्थ वापरून बनवले जातात. ते तुम्हाला हायड्रेटेड ठेवतीलच पण विषारी पदार्थ (Toxic substances) बाहेर टाकण्यासही मदत करतील. विशेष म्हणजे या खास पेयामुळे आपले वाढलेले वजनही कमी होण्यास मदत होते. या पेयांमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. हे पेय नेमके कोणते आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

काकडी

हे खास पेय बनवण्यासाठी काकडीचे पातळ तुकडे करून ते पाण्याच्या भांड्यात टाका. त्यात लिंबाचे पातळ काप आणि काही पुदिन्याची पाने टाका, हे पाणी फ्रीजमध्ये रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सेवन करा. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळते. शिवाय आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळे या पेयाचे या हंगामामध्ये आहारात नक्कीच समावेश करा.

सफरचंद

सफरचंद आणि दालचिनीचे मिश्रण जलद वजन कमी करण्यास मदत करते. सफरचंद आणि लिंबू पातळ काप करा. सफरचंदाचे तुकडे, दालचिनी, पुदिन्याची पाने, आल्याचे तुकडे, लिंबाचे तुकडे पाण्याच्या भांड्यात टाका आणि मिक्स करा. त्यानंतर हे पाणी 8 तास तसेच ठेवा. नंतर ते गाळून घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करून याचे सेवन करा. वजन कमी करण्यास मदत होईल.

सब्जा

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सब्जा खाणे आपल्या आरोग्यासाठी किती जास्त फायदेशीर आहे. सब्जामध्ये भरपूर फायबर असते, ते सुपरफूड म्हणून काम करते. यासाठी एक चमचा सब्जा एका बाटलीत पाण्यात भिजत ठेवा, त्यात लिंबाचे पातळ तुकडे टाका, तासभर तसंच राहू द्या, मग हे अँटीऑक्सिडंट सेवन करा. यामध्ये फायबर असल्यामुळे आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही आणि यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

मेथी

मेथी बाराही महिने खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे पेय बनवण्यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीदाणे भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मेथी दाणे गाळून घ्या. या पाण्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते. शिवाय हे वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते.

धने

रात्री झोपताना दोन चमचे धने पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये लिंबू मिक्स करून घ्या. दहा मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर हे पाणी रिकाम्या पोटी प्या. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तसेच हे खास पेय वजन कमी करण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये हे खास पेय पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

(वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संंबंधित बातम्या : 

Health Care Tips : दिवसभर फ्रेश आणि निरोगी राहण्यासाठी या 4 पेयांचे नक्की सेवन करा!

Skin Care | ‘हे’ घटक तांदळाच्या पिठात मिक्स करून स्क्रब बनवा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!

Non Stop LIVE Update
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.