AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबा खाल्ल्यानंतर कोय फेकून देऊ नका, आरोग्याला मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

उन्हाळा हंगामातील सर्वांच्या आवडीचा फळ म्हणजे आंबा. आंबा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खायला खूप आवडतो. आंब्यापासून काही लोकं शेक आणि काही आंब्याचा आमरस बनवून सेवन करत असतात. पण आंबा खाल्यानंतर याची कोय ही निरुपयोगी मानले जाते आणि फेकून दिले जाते. पण तुम्हाला माहित नाही की आंब्याची कोय आरोग्यासाठी वरदान आहे. या लेखात आपण आंब्याची कोय आरोग्यासाठी कोणते फायदे देऊ शकते ते जाणून घेऊयात.

आंबा खाल्ल्यानंतर कोय फेकून देऊ नका, आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
| Edited By: | Updated on: May 24, 2025 | 7:38 PM
Share

उन्हाळ्याचा सीझन सुरू झाल्यापासून अनेकांच्या घरी मोठ्या प्रमाणत आंबे खाल्ले जात आहे. त्यातच या हंगामात आपल्या बाजारपेठेतही आंब्यांचे अनेक प्रकार मिळत असतात. पण प्रत्येक उन्हाळा हा आंब्याशिवाय अपूर्ण वाटतो. आंबा केवळ चवीलाच उत्तम नाही तर त्याला ‘फळांचा राजा’ असेही म्हणतात. गोड, रसाळ आणि सुगंधी आंबा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच खायला आवडतो. या आंब्यांपासून काही लोक रस बनवतात, तर काहीजण मँन्गो मिल्क शेक बनवून पितात. तर काहींना आंबा कापून खायला सुद्धा आवडतो. पण आंबा खाल्ल्यानंतर आपण अनेकदा त्यातील कोय निरुपयोगी समजून फेकून देतो, पण तुम्हाला माहिती आहे का की ही आंब्याची कोय आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते?

आंब्याच्या कोयमध्ये असलेले पोषक आणि औषधी गुणधर्म आपल्या शरीराचे अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. आयुर्वेदात, आंब्याच्या कोयचा वापर अनेक वर्षांपासून विविध उपचारांमध्ये केला जात आहे. आज या लेखात आपण आंब्याच्या कोयचे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे जाणून घेऊया, जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही ते फेकून देण्यापूर्वी नक्कीच दोनदा विचार कराल.

1. डायरिया आणि लूज मोशनपासून आराम

आंब्याची कोय पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. डायरिया आणि लूज मोशन सारख्या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी आंब्याच्या कोयची पावडर खूप प्रभावी आहे. हे आतड्यांना बळकटी देते आणि पोट शांत ठेवते. यासाठी बिया वाळवून त्याची पावडर बनवा आणि मधात चिमूटभर ही पावडर घेऊन सेवन करा.

2. कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त

आंब्याच्या कोयमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्ताभिसरण सुधारून आपले हृदय निरोगी ठेवते.

3. मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त

आंब्याच्या कोयचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यात काही संयुगे असतात जे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात आणि शरीरात साखरेचे शोषण संतुलित करतात.

4. केस आणि त्वचेसाठी फायदेशीर

आंब्याच्या कोयपासून बनवलेले तेल केसांसाठी खूप चांगले मानले जाते. हे केसांना मऊ, मजबूत आणि चमकदार बनवते. याव्यतिरिक्त हे तेल त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि कोरडेपणा आणि सुरकुत्या कमी करते. म्हणजेच ते कोलेजन वाढवण्यासाठी देखील चांगले आहे. आंब्याच्या कोयपासून काढलेले तेल केस आणि त्वचेवर लावता येते.

5. वजन कमी करण्यास उपयुक्त

आंब्याच्या कोयमध्ये असलेले फायबर पचन सुधारते आणि भूक नियंत्रित करते. याचे नियमित सेवन केल्याने चयापचय गतिमान होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय ही कोय शरीरात फॅट जमा होण्यास प्रतिबंध करते. तुम्ही आंब्याच्या कोयपासून तयार केलेली पावडर पाण्यात मिक्स करून पिऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...