AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Men’s Day: महिलांपेक्षा पुरूषांना ‘या’ 5 आजारांचा धोका अधिक

स्त्रियांच्या तुलनेत पुरूषांना काही शारीरिक समस्या जास्त त्रासदायक ठरू शकतात. त्याचसोबत काही आजार असतात जे पुरूषांना होण्याचा धोका अधिक असतो.

International Men's Day: महिलांपेक्षा पुरूषांना 'या' 5 आजारांचा धोका अधिक
| Updated on: Nov 19, 2022 | 2:29 PM
Share

नवी दिल्ली – आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस (International Men’s Day)आहे. पुरुष हे स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान असतात, असे मानले जाते. मात्र असे असले तरीही याचा दुसरा पैलू असा आहे की काही गंभीर आजारांचा (illness) धोका पुरूषांना जास्त असतो. काही असे आजार आहेत जे स्त्रियांच्या (women) तुलनेत पुरूषांना होण्याचा धोका अधिक असतो.

कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज

स्त्री व पुरूष या दोघांमध्येही सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर वेगवेगळे असते, असे दिसून आले. तरुण स्त्रियांपेक्षा तरुण पुरुषांमध्ये सिस्टोलिक रक्तदाब जास्त असतो. सिस्टोलिक हाय बीपी हे पुरुषांमधील उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण आहे. यामुळे उच्च रक्तदाब होतो. अशा प्रकारे पुरुषांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दबाव जास्त असू शकतो.

हायपरटेन्शन हयपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब हा पुरुषांचा सर्वात मोठा शत्रू आहे. हृदयरोग आणि स्ट्रोक हे पुरुषांमधील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. स्त्रियांमध्ये चांगल्या कोलेस्टेरॉलचे (एचडीएल) प्रमाण नैसर्गिकरित्या जास्त असते, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे. महिला हार्मोन इस्ट्रोजेन हे देखील महिलांमध्ये हृदयरोगासाठी संरक्षक कवच म्हणून काम करते.

प्रोस्टेट कॅन्सर प्रोस्टेट ही पुरूषांच्या पुनरुत्पादन तंत्रामधील एग्झोक्राइन ग्लँड अथवा ग्रंथी आहे. ही ग्लँड ब्लॅडरच्या अगदी खाली स्थित असते. प्रोस्टेट कॅन्सर हा असा आजार आहे जो फक्त पुरुषांमध्येच दिसून येतो. यामध्ये प्रोस्टेटमध्ये कॅन्सरच्या पेशी विकसित होतात. प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे सुरुवातीच्या काळात दिसत नाहीत. पण हा कॅन्सर हळूहळू विकसित झाल्यावर त्याची गंभीर लक्षणे दिसू लागतात हा आजारा 45 ते 50 वयोगटातील वर्षाच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. वाढता स्थूलपणा आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे ही समस्या उद्भवू शकते.

फुप्फुसांचा आजार

स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये फुप्फुसाचा आजार अधिक दिसून येतो. एका अंदाजानुसार, कॅन्सरमुळे मृत्यू पावणारे बहुतेक पुरुषांना फुफ्फुसांचा कॅन्सर झालेला असतो. या कॅन्सरमध्ये फुफ्फुसांच्या पेशी विकसित होऊन गाठी तयार होतात. धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने असल्या तरी पुरुषांचे प्रमाण अजूनही सर्वात जास्त आहे. तसेच बदलत्या पर्यावरणात स्त्रियांपेक्षा पुरुषच जास्त काम करत आहेत. त्यामुळे प्रदूषणाचे दुष्परिणाम स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त भोगावे लागतात.

पुरुषांना त्वचेच्या कॅन्सरचा धोका जास्त

असे दिसून आले आहे की 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना त्वचेच्या कॅन्सरचा धोका स्त्रियांपेक्षा जास्त असतो. सूर्यप्रकाशात जास्त जाणे तसेच नीट काळजी न घेणे हे त्वचेचा कॅन्सर होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. त्यामुळेच या आजाराने पुरूषांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. पुरुषांमध्ये, त्वचेचा कॅन्सर हा डोक्याचा वरचा भाग आणि कानाभोवती होतो कारण या दोन जागा अधिक मोकळ्या असतात.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.