Adulterated Ghee : भेसळयुक्त तूप कसं ओळखावं; ‘या’ टीप्समुळे फसवणूक टळू शकते
How to Identify Adulterated Ghee : अस्सल तूप अन् भेसळयुक्त तूपात काय फरक असतो? भेसळयुक्त तूप कसं ओळखावं? शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तूप यात काय फरक असतो. या टीप्समुळे चांंगलं तूप निवडण्यात तुम्हाला मदत होईल. तुमच्या आरोग्याचा धोका टळेल. त्यामुळे या टीप्स जरूर फॉलो करा

मुंबई | 07 ऑक्टोबर 2023 : तूप… आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. तूपामुळे शरिराला अनेक फायदे होतात. स्किन हेल्दी राहते शिवाय तुमची पचनशक्ती सुधारते. तूपामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसते. पण हेच तूप जर भेसळयुक्त असेल तर मात्र त्याचे दूरगामी परिणाम तुमच्या शरिरावर होतात. बाजारात विविध कंपनीचं तूप विकल्या जातं. शुद्ध तुपाच्या नावाखाली अनेकदा भेसळयुक्त तूपाची विक्री केली जाते. पण मग आपण शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तूप कसं ओळखायचं? आपली फसवणूक कशी टाळायची? यासाठी आम्ही ही बातमी विस्ताराने देत आहोत.
भेसळयुक्त तूप कशापासून बनतं?
वनस्पती तूप आणि तिळाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करत हे भेसळयुक्त तूप बनवलं जातं. यामुळे अशुद्धाला चिकटपणा येतो. या तूपालाही शुद्ध तुपासारखाच वास असतो. चवही अगदी तशीच असते. हे बनावट तूप शुद्ध तूपाच्याच किमतीलाच विकलं जातं. पण असं बनावट तूप खाल्ल्यास त्याचा शरिरावर परिणाम होतो. हृदयविकार आणि पक्षाघातासारखे आज होऊ शकतात.
तूपाला पाहिल्यावर ते शुद्ध आहे की अशुद्ध हे ओळखता येणं कठीण आहे. पण शुद्ध तुपाची ISI मार्किंग आणि FSSAI नोंदणी केलेली असते. त्याचा परवाना क्रमांक त्या तूपाच्या डब्यावर असतो. याशिवाय तूपाच्या डब्यावर दिलेली माहिती वाचल्यात यात असणाऱ्या पोषक तत्वांचा उल्लेख केलेला असतो. ते पाहूनच तूपाची खरेदी करावी.
जेव्हा तुम्ही तूप खरेदी करता तेव्हा त्याचे शरिराला असणारे फायदे लक्षात घेऊनच तुम्ही तूप खरेदी करण्याचा विचार करता. अशावेळी हे तूप आपण चांगल्या दुकानातूनच खरेदी केलं पाहिजे. तूप सुटं घेतल्यास फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या कंपनीचं तूप खरेदी करावं. सुटं तूप घेणं टाळावं. यामुळे तुमची फसवणूक टळेल. भेसळयुक्त तुपाच्या सेवनाने तुमच्या शरिरावर दुष्परिणाम होणार नाहीत.
तूप शरिरासाठी चांगलं असतं. तूपामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं. पचनक्रिया सुरळीत होते. शिवाय तुमचा चेहरा ग्लो करण्यासही मदत होते.
