Diwali Skin Care Tips: दिवाळीच्या साफ-सफाईत व्यस्त असतानाही अशी घ्या त्वचेची काळजी

| Updated on: Oct 18, 2022 | 5:43 PM

सणांच्या दिवशी आपली त्वचा निस्तेज आणि काळवंडलेली दिसू शकते. काही उपायांचा अवलंब करून तुम्ही त्वचा निरोगी व चमकदार बनवू शकता.

Diwali Skin Care Tips: दिवाळीच्या साफ-सफाईत व्यस्त असतानाही अशी घ्या त्वचेची काळजी
दिवाळीच्या साफ-सफाईत व्यस्त असतानाही अशी घ्या त्वचेची काळजी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: दिवाळीचा (diwali) सण साजरा करण्यापूर्वी लोकं घराची साफसफाई (cleaning) करून रंग लावून घराचे सौंदर्य वाढवतात. दिवाळीची तयारी करताना स्वच्छता अत्यावश्यक असली तरी त्याचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नव्हे तर त्वचेवरही (skin care) दिसून येतो. सणासुदीच्या काळात स्वच्छता करताना उडालेली धूळ वगैरे यामुळे त्वचेवर पुरळ, मुरुम येणं किंवा कोरडेपणा येऊ शकतो.

लोकं साफसफाईमध्ये इतके व्यस्त होतात की त्यांना स्वत: ची काळजी घेण्यासाठी वेळच मिळत नाही. हे करणे काही लोकांसाठी गरजेचे असू शकते, परंतु त्यामुळे, सणाच्या दिवशी त्वचा निस्तेज आणि गडद दिसू शकते. इथे आपण काही अशा उपायांबद्दल जाणून घेऊया ज्याचा अवलंब करून तुम्ही त्वचा निरोगी व चमकदार बनवू शकता.

हे सुद्धा वाचा

क्लींजर

साफसफाई करताना हवेत असलेली माती चेहऱ्यावर उडते आणि ती चेहऱ्यावर बसू शकते. त्वचेवर जमा झालेली घाण वेळेत काढली नाही तर चेहऱ्यावर पिंपल्स अथवा काळे डाग येऊ शकतात. त्वचा निस्तेज आणि काळी पडू नये यासाठी दिवसातून किमान तीन वेळा चेहरा स्वच्छ धुवावा. याशिवाय क्लिंजरने त्वचा स्वच्छ करणे विसरू नका. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी क्लिंजरचा वापर करा.

एक्सफॉलिएशन

आपली त्वचा निस्तेज होण्याचे प्रमुख कारण म्हणजे धूळ व घाण व ती वेळीच दूर केली पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही घरगुती कॉफी स्क्रबने त्वचा एक्सफॉलिएट करू शकता. त्यासाठी थोडा मध घेऊन त्यामध्ये कॉफी पावडर मिसळावी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर स्क्रब करावे. एक्सफॉलिएशनसाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले स्क्रबही वापरू शकता.

मधाचा वापर

मधामध्ये इन्फ्लेमेटरी आणि अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म असतात आणि त्यामुळेच मध हा त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. तुम्ही त्वचेवर मधाच्या मास्कचा वापर करू शकता. त्यासाठी एका बाऊलमध्ये मध घेून तो हाताने चेहऱ्यावर हळूवारपणे लावावा. मध हा आपली त्वचा मऊ बनवण्याचे कार्य करेल. या उपायाचा अवलंब केल्याने त्वचेतील ओलावाही कायम राहील.

कोरफडीचे जेल

कोरफडीचे जेल हे त्वचेसाठी वरदान मानल जाते. त्यातील अँटी-बॅक्टेरिअल तत्वं ही आपली त्वचा दुरूस्त करून ती पुन्हा चमकदार बनवण्याचे कार्य करतात. रोज रात्री झोपताना कोरफडीच्या जेलच्या उपायाचा अवलंब करा.

त्यासाठी एका बाऊलमध्ये कोरफडीचे जेल घेऊन ते हळूवार हाताने चेहऱ्यावर लावून चोळावे. थोड्या वेळाने साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.