AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Symptoms To Never Ignore: या 8 लक्षणांकडे कधीच करू नका दुर्लक्ष! आरोग्य येईल धोक्यात

डोकेदुखी, ॲसिडिटी, गॅसेस या साध्या समस्या मानल्या जातात व ते आपोआप बरे होईल असे समजून त्याकडे फार लक्ष दिले जात नाही. पण या समस्यांचा त्रास वारंवार होत असेल तर त्याकड दुर्लक्ष करण्याची चूक कधीच करू नका.

Symptoms To Never Ignore: या 8 लक्षणांकडे कधीच करू नका दुर्लक्ष! आरोग्य येईल धोक्यात
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 06, 2023 | 12:47 PM
Share

नवी दिल्ली – डोकेदुखी, पीएमएस, मूड स्विंग आणि गॅसेस (gases) यांना साधारणत: आरोग्याच्या सामान्य (health problems) समस्या मानले जाते. हा त्रास आपोआप कमी होईल असे समजून आपण बऱ्याच वेळेस त्याकडे दुर्लक्ष करतो. पण हे कितपत योग्य आहे ? आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या समस्यांकडे अथवा आरोग्याच्या या लक्षणांकडे (do not ignore health) दुर्लक्ष करणे बिलकूल योग्य नाही. आरोग्याची अशी 8 लक्षणे आहेत, त्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये, अन्यथा ते फार महागात पडू शकते.

वारंवार डोकेदुखी होणे

डोकेदुखी ही एक सामान्य गोष्ट असली तरी ती सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. सतत डोकेदुखीचा अर्थ असा होऊ शकतो की जळजळ किंवा एखाद्या गोष्टीच्या कमतरतेमुळे शरीर इन्फ्लेमेटरी साइटोकिन्स सोडत आहे. त्यामुळे वारंवार डोकेदुखी होत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

ॲसिड रिफ्लेक्स

ॲसिड रिफ्लेक्स ही पोटातील एक सामान्य समस्या मानली जाते, जी पचनाशी संबंधित आहे. पण तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, याचा अर्थ असा होतो की शरीर पचनासाठी आवश्यक ॲसिड तयार करत नाही आणि जे ॲसिड तयार होत आहे ते चुकीच्या ठिकाणी म्हणजेच अन्ननलिकेत जात आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष द्यावे.

वारंवार गॅसेस आणि ब्लोटिंग होणे

पोट फुगणे आणि गॅस ही पीएमएसची लक्षणे आहेत किंवा जड अन्न खाल्ल्यानंतर हा त्रासस होतो. जर असे वारंवार होत असेल तर याचा अर्थ असा होतो की अन्नाचे नीट पचन होत नाही व ते आतड्यात बराच काळ अडकले आहे. त्यामुळे त्यावर वाढणारे बॅक्टेरिया गॅस सोडतात, ज्यामुळे पोट फुगते.

मासिक पाळी दरम्याम मायग्रेनचा त्रास आणि मूड स्विंग

महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान हार्मोनल असंतुलन होते. मूड बदलणे सामान्य आहे, परंतु जर ते अधिक त्रासदायक असेल तर ते हाय (उच्च) इस्ट्रोजेन पातळी आणि कमी प्रोजेस्टेरॉन पातळीमुळे असू शकते.

सतत थंडी वाजणे

काही लोकांना इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवते, परंतु हे शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे असू शकते. ज्याचा परिणाम थायरॉईड ग्रंथीवर होतो, जी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम करते. सतत थंडी वाजणे चांगले नाही.

पाठ आणि गुडघेदुखी

आतड्याचे आरोग्य सुधारले की कंबर, पाठ आणि गुडघेदुखी नाहीशी होऊ शकते. आतड्यात जळजळ झाल्यामुळेही या ठिकाणी वेदना होतात. त्याशिवाय या दुखण्यामागे इतरही कारणे असू शकतात.

सायनस आणि श्वासोच्छवासाच्या समस्या

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सायनसच्या 80 टक्के केसेस या शरीरात अन्न न पचल्यामुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे उद्भवतात होतात. शरीरात जळजळ झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

अचानक वजन वाढणे

शरीराचे वजन अचानक वाढले, तर ते कोणालाही आवडत नाही. पोटाच्या आसपास अअचानक चरबी जमा होणे, याचा अर्थ पोटातील ॲसिड कमी होणे तसेच थायरॉईडची समस्या निर्माण होणे, असाही होऊ शकतो.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.