मायक्रोवेव्ह मध्ये चुकूनही गरम करू नका हे पदार्थ, नाहीतर…..

मायक्रोवेव्हमध्ये काही खाद्यपदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यांची चव आणि पौष्टिक मूल्य खराब होऊ शकते.

मायक्रोवेव्ह मध्ये चुकूनही गरम करू नका हे पदार्थ, नाहीतर.....
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 7:40 PM

नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात गरजेपेक्षा थोड जास्त अन्न शिजवलं जातं. कोणालाही जास्त भूक लागली किंवा पै-पाहुणा आला तर त्यांना पोटभर जेवता यावं यासाठी हा खटाटोप. मात्र उरलेलं हे अन्न खाण्यापूर्वी लोकं ते गरम करून खाण्यास प्राधान्य देतात. काही जण गॅसवर तर काही लोकं मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करतात. मायक्रोवेव्हमुळे (microwave) लोकांचं काम सुलभ, सोपं झालयं यात काहीच शंका नाही. पण काही लोक उठसूठ कोणतेही पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम करतात, जे धोक्याचे ठरू शकते.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण मायक्रोवेव्हमध्ये काही खाद्यपदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यांची चव आणि पौष्टिक मूल्य खराब होऊ शकते. मायक्रोवेव्हमध्ये आपण कोणते पदार्थ गरम करू शकतो आणि कोणते पदार्थ गरम करणे योग्य नाही, हे आपल्याला माहित असले पाहिजे. आज आशचा काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे टाळले पाहिजे.

फ्रेंच फ्राईज आणि तळलेले पदार्थ

तळलेले पदार्थ किंवा फ्रेंच फ्राईज मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करण्याची चूक करत असाल तर आजपासून असे बिलकूल असे करू नका. कारण फ्रेंच फ्राईज मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास त्यांची कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो आणि त्यांची चव देखील बदलू शकते.

मांस

बहुतेक लोकांना मांस गरम असताना खायला आवडतं, जरी ते शिळे झाले असले तरीही बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये ते गरम करून खाण्याची चूक करतात. पण असे करू नये. कारण ओव्हनमध्ये मांस गरम केल्याने त्याची चव खराब होऊ शकते. ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याऐवजी तुम्ही ग्रिलवर किंवा पॅनमध्ये तळू शकता.

अंड्याचे पदार्थ

अंड्याचे पदार्थ कधीच मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नयेत. अंड्याची एखादी डिश बनवली तर ती लगेचच खावी किंवा परत गरम केली तर थोडं गार करून खावी.

हिरव्या पालेभाज्या

पालक, साग, मेथी यांसारख्या भाज्यांमध्ये नायट्रेट असते. ओव्हनमध्ये हिरव्या भाज्या गरम केल्यावर त्यात असलेले नायट्रेट हानिकारक बनते, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.