AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, मात्र एका दिवसातील कोरोनाबळी पुन्हा 500 च्या पार

गेल्या 24 तासात भारतात 15 हजार 906 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 561 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 16 हजार 479 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, मात्र एका दिवसातील कोरोनाबळी पुन्हा 500 च्या पार
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 10:00 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 2 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 15 हजार 906 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 561 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता पावणेदोन लाखांच्या आत आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 15 हजार 906 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 561 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 16 हजार 479 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 41 लाख 75 हजार 468 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 48 हजार 605 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 54 हजार 269 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 1 लाख 72 हजार 594 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 102 कोटी 10 लाख 43 हजार 258 च्या वर गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 15,906

देशात 24 तासात डिस्चार्ज – 16,479

देशात 24 तासात मृत्यू – 561

एकूण रूग्ण – 3,41,75,468

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 1,72,594

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,35,48,605

एकूण मृत्यू  – 4,54,269

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 1,02,10,43,258

गेल्या 24 तासातील लसीकरण – 

संबंधित बातम्या :

कोरोना काळात पेट्रोल अन् डिझेलच्या किमतीत मोठी वाढ, पेट्रोल 36 रुपयांनी, डिझेल 27 रुपयांनी महाग

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.