Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच, कोरोनाबळी 723 वर

गेल्या 24 तासात भारतात 39 हजार 796 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 723 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 42 हजार 352 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच, कोरोनाबळी 723 वर
CORONA

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 39 हजार 796 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 723 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. (New 39796 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 39 हजार 796 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 723 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 42 हजार 352 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 5 लाख 85 हजार 229 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 97 लाख 430 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 2 हजार 728 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 82 हजार 71 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 35 कोटी 28 लाख 92 हजार 46 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 39,796

देशात 24 तासात डिस्चार्ज – 42,352

देशात 24 तासात मृत्यू – 723

एकूण रूग्ण –  3,05,85,229

एकूण डिस्चार्ज – 2,97,00,430

एकूण मृत्यू – 4,02,728

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,82,071

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 35,28,92,046

संबंधित बातम्या :

लसीकरणात महाराष्ट्राची रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरुच, दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण

Mumbai Corona | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 7473 लहान मुलं बाधित, एकाचा मृत्यू

(New 39796 Corona Cases in India in the last 24 hours)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI