AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दोन दिवसात 12 हजारांनी वाढ, सक्रिय रुग्णही वाढले

गेल्या 24 तासात भारतात 43 हजार 263 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 338 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 40 हजार 567 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दोन दिवसात 12 हजारांनी वाढ, सक्रिय रुग्णही वाढले
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 09, 2021 | 9:38 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 6 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात 43 हजार 263 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होत असताना गेल्या दोन दिवसांत अचानक 12 हजारांनी वाढ झाल्याचं दिसत आहे. तर काल 338 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 43 हजार 263 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 338 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 40 हजार 567 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 31 लाख 39 हजार 981 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 23 लाख 4 हजार 618 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 41 हजार 749 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 93 हजार 614 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 71 कोटी 65 लाख 97 हजार 428 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 43,263

देशात 24 तासात डिस्चार्ज – 40,567

देशात 24 तासात मृत्यू – 338

एकूण रूग्ण – 3,31,39,981

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,93,614

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,23,04,618

एकूण मृत्यू  – 4,41,749

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 71,65,97,428

गेल्या 24 तासातील लसीकरण – 86,51,701

केरळात किती कोरोनाग्रस्त?

43 हजार 263 नवीन कोरोनाग्रस्तांपैकी एकट्या केरळमध्ये काल 30 हजार 196 रुग्ण सापडले, तर 338 कोरोना बळींपैकी केरळात 181 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भिती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ