AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेवरील सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला, किर्र जंगलात नराधमांनी हात टाकला, धक्कादायक घटना समोर!

महिलेसोबत कुकृत्य करताना या दोन्ही नराधमांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचाही प्रकार समोर आला आहे. या दोघांनी महिलेवरील अत्याचाराचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचेही समोर आले आहे.

महिलेवरील सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला, किर्र जंगलात नराधमांनी हात टाकला, धक्कादायक घटना समोर!
jalgaon woman assault caseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2026 | 9:15 PM
Share

Jalgaon :  महिलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून अतिशय कठोर कायद्यांची तरतूद आहे. परंतु तरीदेखील रोज राज्यात महिला अत्याचाराच्या घटडतच आहेत. राज्याच्या कोणत्यातरी भागात खून, बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, माहराण अशा प्रकरणांची नोंद होते. काही प्रकरणं तर एवढी भीषण असतात की त्याबाबत समजताच समाजातून मोठा संताप व्यक्त केला जातो. सध्या जळगाव जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली आहे. जंगलात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

दाखल तक्रारीनुसार जळगावच्या जामनेर तालुक्यातील एका रोडच्या बाजूला असलेल्या जंगलात 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी अशी दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनी महिलेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला, असा आरोप करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ सोशल मीडियावर केले व्हायरल

महिलेसोबत कुकृत्य करताना या दोन्ही नराधमांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचाही प्रकार समोर आला आहे. या दोघांनी महिलेवरील अत्याचाराचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचेही समोर आले आहे. पीडित महिला जंगलात तिच्या ओळखीच्या तरुणांबरोबर बसलेली होती. याच वेळी आरोपी दोघेजण त्यांच्याकडे गेले.

15 जणांविरोधात गुन्हा दाखल, 14 जणांना अटक

मित्रांसोबत महिला दिसताच त्यांनी तिला धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, अशी माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत अत्याचार करणाऱ्या दोघांसह 14 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास आता चालू करण्यात आला आहे. या घटनेतील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. पोलिसांनीही आरोपींना अटक केली असून सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा