AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबा पिकवायचा? ‘या’ उपायांनी केमिकलशिवाय घरीच पिकवा

बाजारातून आलेले कच्चे आंबे पिकवण्यासाठी केमिकल्सवर अवलंबून न राहता, या 4 सोप्या आणि नैसर्गिक पद्धती वापरा. यामुळे तुमचं कुटुंब सुरक्षित राहील आणि तुम्हाला आंब्याचा खरा स्वाद अनुभवता येईल.

आंबा पिकवायचा? 'या' उपायांनी केमिकलशिवाय घरीच पिकवा
| Edited By: | Updated on: Jun 24, 2025 | 10:35 PM
Share

उन्हाळा आला की प्रत्येकालाच ज्या फळाची सर्वात जास्त उत्सुकता असते ते म्हणजे आंबा! पण बाजारातून घेतलेले अनेक आंबे कॅल्शियम कार्बाइड किंवा इतर केमिकल्सने जबरदस्तीने पिकवलेले असतात, जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. अशावेळी जर तुमच्याकडे कच्चे आंबे असतील, तर त्यांना घरीच नैसर्गिकरित्या आणि सुरक्षितरीत्या पिकवण्याचे काही उत्तम आणि पारंपरिक उपाय आहेत, जे या लेखात आपण पाहणार आहोत.

तांदळाच्या डब्यात ठेवा

तांदळाच्या डब्यात कच्चे आंबे पिकवणं हा एक पारंपरिक आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामध्ये कच्चे आंबे चांगल्या प्रकारे तांदळात दाबून ठेवले जातात. तांदळाचे दाणे आंब्याभोवती एक नैसर्गिक उष्णता निर्माण करतात, त्यामुळे 2 ते 4 दिवसांमध्ये आंबे पिवळसर आणि रसाळ होतात. या पद्धतीत केमिकलचा पूर्णपणे तिटकारा असून, आंब्याची गोडी आणि गुणवत्ता कायम राहते.

सूती कपड्याचा वापर करा

जर तुमच्याकडे आंब्यांची संख्या कमी असेल, तर त्यांना एका जाड सूती कपड्यात लपेटून घराच्या कोपऱ्यात ठेवता येते. हा कपडा आंब्याची ओलावा टिकवून ठेवतो आणि गरम वातावरण तयार करतो. यामुळे हळूहळू नैसर्गिकरित्या आंबा पिकतो. हा उपाय खास करून अशा वेळी उपयुक्त ठरतो जेव्हा वेळेची फार घाई नाही

वर्तमानपत्राचा उपयोग करा

आंब्यांना वर्तमानपत्रात गुंडाळून छायेत, कोरड्या जागी ठेवणं हा एक जुना पण आजही उपयोगी उपाय आहे. कागद आंब्याभोवती थोडी उष्णता निर्माण करतो आणि त्यातून निघणाऱ्या वायूंना शोषतो. त्यामुळे आंबे हळूहळू आणि समान पद्धतीने पिकतात. दररोज वर्तमानपत्र उघडून पाहणं आवश्यक आहे, जेणेकरून आंबा पूर्णपणे पिकलाय का, हे समजेल.

पिकलेल्या फळांसोबत ठेवा

पिकलेले केळं, सफरचंद किंवा इतर फळे एथिलीन नावाचा वायू सोडतात, जो आंब्याला लवकर पिकवतो. त्यामुळे कच्चे आंबे पिकलेल्या फळांसोबत बंद डब्यात किंवा पिशवीत ठेवल्यास, 1-2 दिवसांतच फरक जाणवतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

फायदे काय?

या सगळ्या उपायांत कुठलाही रासायनिक पदार्थ वापरलेला नसतो, त्यामुळे आंब्याची गोडी, रसाळपणा आणि पोषणमूल्यं टिकून राहतात. शिवाय, घरच्या घरी सहज करता येणारे हे उपाय पर्यावरणपूरक आणि आरोग्यास अनुकूल आहेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.