AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये तुम्हीही करत आहात या चुका? वाचा मग होणारे दुष्परिणाम!

रात्रीचे जेवण न केल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते, त्यामुळे शरीर आतून कमजोर होऊ लागते. त्यामुळे थकवा आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे, खूप अशक्तपणा देखील जाणवू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे तणाव आणि चिंतेची समस्या उद्भवू शकते.

Weight loss : वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये तुम्हीही करत आहात या चुका? वाचा मग होणारे दुष्परिणाम!
Image Credit source: shutterstock.com
| Updated on: Jun 20, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : बरेच लोक वजन कमी (Weight loss) करण्यासाठी दिवसातून एकदाच जेवतात. तसेच रात्रीचे जेवण बंद केल्याने वजन झपाट्याने कमी होते, असा अनेकांचा गोड गैरसमज आहे. रात्रीच्या वेळा हलके आणि पचण्यास सोपे अन्न खायला हवे. मात्र, याचा अर्थ अजिबात असा नाही की, आपण रात्रीचे जेवणच (Dinner) बंद करायला हवे. जर रात्रीचे सेवन बंद केले तर आरोग्याशी संबंध अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या शरीरासाठी रात्रीचे जेवण अत्यंत आवश्यक असते. जर आपण रात्री जेवण केले नाहीतर आपण आजारीही पडू शकता. शक्यतो रात्री उशीरा जेवू नका. रात्री उशीरा जेवल्याने अन्न पचत नाही आणि पोटाशी संबंधित समस्या (Problem) वाढू शकतात.

ऊर्जा

रात्रीचे जेवण न केल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते, त्यामुळे शरीर आतून कमजोर होऊ लागते. त्यामुळे थकवा आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे, खूप अशक्तपणा देखील जाणवू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे तणाव आणि चिंतेची समस्या उद्भवू शकते. यामुळेच नेहमी रात्री जेवण करा. फक्त 7 च्या अगोदर रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा.

पौष्टिक कमतरता

वजन कमी करण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी जेवण वगळणे हा कोणत्याही समस्येसाठी पर्याय नाही. तुम्ही रोज रात्रीचे जेवण केले नाहीतर तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळणार नाहीत. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते. यामुळे आजारीही पडण्याची शक्यता असते. बरेच लोक रात्रीचे जेवण करणे टाळतात. मात्र, परत रात्री झोप येत नाही. मग अशावेळी फास्टफूड खाण्यावर भर देतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

रात्रीच्या जेवणात हे पदार्थ घ्या

रात्रीचे जेवण नेहमीच हलके आणि पचायला सोपे असावे. रात्रीच्या जेवणामध्ये आपण खिचडी, वरण भात, दलिया, मखाणा, पालेभाज्यांचा सूप, फळांचा सूप, रस, भाकरी, छोटी पोळी, हिरव्या भाज्या हे घेऊ शकता. तसेच रात्रीच्या जेवणानंतर अर्धा ग्लास दूध देखील घ्या. रात्रीचे जेवण शक्यतो सातच्या अगोदरच करण्याचा प्रयत्न करा. तसेच जेवण झाल्यानंतर किमान वीस मिनिटे तरी फिरा. यामुळे अन्न पचण्यास मदत होते. कधीही जेवण केल्यावर लगेचच अजिबात झोपू नका. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि अन्न व्यवस्थित पचत नाही.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.