AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त दारूच नाही तर ‘या’ गोष्टींनीही तुमचं लिव्हर होऊ शकते खराब! वेळीच व्हा सावध; लिव्हर निरोगी ठेवायचे असल्यास, या गोष्टी चुकूनही खाऊ नका

एरव्ही लिव्हर खराब होण्याला दारुच कारणीभूत असल्याचा दृढ समज पसरलेला आहे. म्हणूनच दारु पिणारे आणि न पिणारे असे दोघेही दोघेही जाणीवपूर्वक या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना आढळून येतात. परंतु, केवळ दारूमुळेच नाही तर, इतरही अनेक गोष्टीमुळे तुमचे लिव्हर खराब होऊ शकते.

फक्त दारूच नाही तर ‘या’ गोष्टींनीही तुमचं लिव्हर होऊ शकते खराब! वेळीच व्हा सावध; लिव्हर निरोगी ठेवायचे असल्यास, या गोष्टी चुकूनही खाऊ नका
फक्त दारूच नाही तर ‘या’ गोष्टींनीही तुमचं लिव्हर होऊ शकते खराब
| Updated on: Jun 12, 2022 | 11:20 PM
Share

तुमचे स्वास्थ चांगले राखण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या लिव्हर अर्थात यकृताच्या आरेाग्यावर (On the healing of the liver) तुम्हीच दुर्लक्ष केलं तर, मग काही खर नाही बुवा. कारण मग तुम्हाला अनेक दुर्धर आजारांचा सामना करावा लागू शकतो हे निश्चीत. यकृत हा आपल्या शरीराचा रासायनिक पृथक्करण (Chemical dissociation) प्रयोगशाळाच मानली जाते, कारण ते रक्तातील रासायनिक पातळी राखण्यासाठी चोवीस तास कार्यरत असते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा एकमेव अवयव आहे. नकळत लोक यकृताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि अशा अनेक गोष्टी करतात, ज्यामुळे लिव्हर निकामी होऊ लागते. अशा वेळी तुमच्या यकृतासाठी घातक (Harmful to the liver) सवयींबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते.

आहारावर लक्ष केंद्रीत करा

जर तुम्हाला तुमचे यकृत निरोगी ठेवायचे असेल तर सर्वांत प्रथम तुमचा आहार काय, हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे, असे आरोग्य तज्ज्ञ मानतात. तसेच तुमच्या यकृतासाठी कोणते अन्न फायदेशीर आहे आणि कोणत्या गोष्टी तुमच्या यकृताला हानी पोहोचवू शकतात याबाबतही सावधानता बाळगायला हवी. मद्यपानासोबतच प्रमाणापेक्षा अधिक लठ्ठपणा असल्यास लिव्हर खराब होण्याचा धोका अधिक वाढतो.

लिव्हर निरोगी ठेवायचे असल्यास, या गोष्टी खाऊ नका

साखर

जास्त साखर फक्त तुमची हाडे व दातांसाठीच हानिकारक नाही तर, ते तुमच्या यकृतालाही नुकसान पोहोचवू शकते. यकृत चरबी बनवण्यासाठी फ्रुक्टोज नावाची साखर वापरते. साखर आणि उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप चे जास्त प्रमाणात सेवन केल्याने लिव्हरशी निगडीत रोगांचा धोका वाढू शकतो. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की, साखर यकृताला मद्या प्रमाणेच(अल्कोहोल)नुकसान करते.

अ जीवनसत्वाचे जास्त प्रमाणात सेवन

शरीराला अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची गरज भासते, त्यातील एक जीवनसत्त्व अ. शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता ताजी फळे आणि भाज्यांनी भरून काढता येते. लाल, केशरी आणि पिवळ्या रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आढळते. असे असताना, लोक नैसर्गिक पद्धतीने फळ-भाजीपाल्यातून व्हिटॅमीन घेण्याऐवजी आता व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स घेण्याकडे वळले आहेत. हिटॅमिन ए सप्लिमेंट्सचा ओव्हर डोस घेतल्यास यकृताला धेाका संभवतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स घ्यायचीच असतील, तर तज्ज्ञ डॉक्टरांच्याच सल्ल्याने घ्यावीत.

मैदा

तुम्ही नेहमी मैदायुक्त पदार्थ खाणे टाळावेत. हे मुख्यतः प्रक्रिया केलेले असल्याने, त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे प्रमाण जवळपास नसतेच. याव्यतिरिक्त, ते शरीराच्या रक्तातील साखरेची पातळी देखील वाढवते. अशा परिस्थितीत पास्ता, पिझ्झा, बिस्किटे, ब्रेड यासारख्या गोष्टींचे सेवन टाळणे गरजेचे आहे. या सर्वांमध्ये मैद्याचा वापर होतो. या गोष्टींचे सेवन न केल्याने तुमचे यकृतही निरोगी राहते.

बिफ किंवा रेडमिट

तुमच्या लिव्हरला प्रथिने समृद्ध लाल मांस पचवणे खूप कठीण आहे. यकृतासाठी प्रथिनांचे विघटन करणे सोपे नसते. त्यामुळे, जास्त प्रथिने तयार होऊ लागल्यास लिव्हर संबंधित रोगांचा धोका वाढू शकतो. फॅटी लिव्हर रोगांसह जे मेंदू आणि मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवू शकतात.

वेदानाशामक औषधी

साधारणपणे दाढ-डोकेदुखी पासून ते थेट संधीवाताच्या आजारांमध्ये वेदनाशामक गोळ्यांचा भरमसाठ वापर केलेला आपण बघतो. भारतीय औषध विक्रेत्यांकडे सर्वाधिक विकले जाणारे औषध म्हणजे वेदनाशामक औषधे होत. म्हणून आपण यांचा वापर किती करतो हे देखील स्वतःहुन जाणून घ्या. जर तुम्ही चुकून त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचा तुमच्या यकृतावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे किडनीसहीत तुमच्या लिव्हरलाही मोठे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वेदनाशामक औषधांचा वापर करा. (Not only alcohol but these things can also damage your liver Be careful in time If you want to keep your liver healthy don’t eat these things by mistake)

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.