सिगारेट, ‘चुकीची जीवनशैली’ एवढंच नाही तर..या पेयाने वाढतोय कॅन्सरचा धोका!

आजही आधुनिक युगात कॅन्सर अनेकांना आपल्या कवेत घेत आहे. जगभरात दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने मरतात. कॅन्सर होण्यामागची पारंपरिक कारणे वगळता एक असे एक पेय देखील आहे. जे पिल्याने कर्करोगाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. आणि हे संशोधनात सप्रमाण सिद्ध झाले आहे.

सिगारेट, ‘चुकीची जीवनशैली’ एवढंच नाही तर..या पेयाने वाढतोय कॅन्सरचा धोका!
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 1:36 AM

कर्करोग हा एक असा आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. ज्यामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. अशा या घातक आजारामुळे शरीरातील पेशी नष्ट (cells destroyed) होऊ लागतात आणि नंतर हळूहळू शरीराचे अवयव काम करणे बंद करतात. हा आजार वेळीच लक्षात आल्यास कर्करोगावर उपचार करता येतात. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च नुसार काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. या गोष्टी थांबविल्या तर कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. तळलेले अन्न, जास्त शिजवलेले अन्न, साखर आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट्स आणि प्रक्रिया केलेले मांस (Processed meat) यांच्या व्यतिरिक्त, एक पेय आहे ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. केवळ अनहेल्दी लाईफ स्टाईल(Unhealthy lifestyle) कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस मदत करते असे, नाही तर एक असे पेय आहे. जे कर्करोगाचा धोका देखील वाढवते. यूकेमध्येही हे पेय कर्करोगाला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते. जाणून घ्या, ते कोणते पेय आहे.

कॅन्सरचा धोका वाढवणारे पेय

Express.co.uk च्या मते, कर्करोगाच्या पेशी वाढवणारे पेय म्हणजे ‘अल्कोहोल’. मिळालेल्या माहितीनुसार, कॅन्सर रिसर्च यूकेचे म्हणणे आहे की, जास्त अल्कोहोल प्यायल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. ब्रिटनमध्येही या पेयामुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना मद्यपान कमी करण्याचा आणि मर्यादेपेक्षा जास्त दारू पिणाऱ्यांची संख्या कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दारूबंदी असूनही निर्मिती अधिक

स्टॅटिस्टा संशोधन विभागाने मार्च 2022 मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, 2020 मध्ये भारतात अल्कोहोलचा वापर सुमारे पाच अब्ज लिटर होता आणि 2024 पर्यंत हा आकडा 6.21 अब्ज लिटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतातील मद्य बाजारात दोन मुख्य प्रकारचे मद्य आहेत, इंडियन (मेड इन इंडिया लिकर) अर्थात देशी (IMIL) आणि मेड इन इंडिया फॉरेन लिकर (IMFL) जसे की: बिअर, वाईन इ. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, देशी दारूची बाजारपेठ भारतात सर्वाधिक होती आणि आजही आहे. युनायटेड स्टेट्स सारख्या इतर देशांच्या तुलनेत भारतात प्रति प्रौढ मद्यपानाचे प्रमाण खूपच कमी होते, परंतु भारतात तरुणांचे मद्यपान जास्त आढळून आले. संशोधनानुसार, 25 वर्षांखालील 88 टक्क्यांहून अधिक भारतीय वयापेक्षा कमी असूनही दारू विकत घेतात किंवा पितात. देशभरातील काही राज्यांमध्ये दारूबंदी असतानाही हा आकडा होता.

हे सुद्धा वाचा

कॅन्सरचे कारण – अल्कोहोल

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, रेड वाईन, व्हाईट वाईन, बिअर आणि मद्य यांसह सर्व अल्कोहोलिक पेये कर्करोगाचा धोका वाढवतात. लोक जितके जास्त मद्यपान करतात तितका त्यांचा कर्करोगाचा धोका वाढतो. Express.co.uk नुसार, संशोधक अनेक वर्षांपासून याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अलीकडेच ते योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ, पॅकिंग युनिव्हर्सिटी आणि चायनीज ऍकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, बीजिंगच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, अल्कोहोल थेट कर्करोगास कारणीभूत ठरते.

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.