Obesity Causes | फक्त अतिखाण्याने वजन वाढतं असं नाही, जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची कारणं

जर कॅलरीज कमी केल्यावरही किंवा व्यायाम केल्यावरही तुमचं वजन कमी होत नसेल तर याचं कारण कुठलं दुसरंही राहू शकतं

Obesity Causes | फक्त अतिखाण्याने वजन वाढतं असं नाही, जाणून घ्या 'ही' महत्त्वाची कारणं
वजन कमी करायचेय ? मग या गोष्टींचे सेवन करा, पोटाची चरबी होईल गायब
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 3:06 PM

मुंबई : नेहमी लठ्ठपणासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींना जबाबदार मानलं जातं (Obesity Causes Surprisingly). पण, फक्त खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो असं नाही. जर कॅलरीज कमी केल्यावरही किंवा व्यायाम केल्यावरही तुमचं वजन कमी होत नसेल तर याचं कारण कुठलं दुसरंही राहू शकतं (Obesity Causes Surprisingly).

हायपोथायरायडिज्म : जर तुमचा थायरॉईड पर्याप्त थायराईड हार्मोन तयार करत नसतील तर तुम्हाला थकवा, अशक्तपणा, थंडी वाजणे आणि वजन वाढण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पर्याप्त थायराईड हार्मोननुसार मेटाबॉलिज्म कमजोर होतो आणि त्यामुळे वजन वाढतं

मेनोपॉज : अनेक महिलांचं वजन मेनोपॉजदरम्यान वजन वाढतं, पण त्याचं कारण फक्त हार्मोन नाही. वय वाढण्यासोबतच मेटाबॉलिज्म कमजोर होतो आणि त्यामुळे कॅलरी बर्न होत नाही.

झोप पूर्ण न होणे : झोप पूर्ण न झाल्यानेही वजन वाढू शकतं. जर तुम्ही उशिरा रात्रीपर्यंत जागत असाल तर तुम्हाला भूक लागते आणि तुम्ही काही ना काही खात राहाता. त्यामुळे कॅलरीज वाढतात. झोप पूर्ण न झाल्याने हार्मोनचं नियंत्रण बिघडतं आणि त्यामुळे सतत भूक लागत असते.

तणाव : तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन बनतात ज्यामुळे भूक वाढते. तणावखाली असणे मूड खराब असणे यामुळे आपण हाय कॅलरी असलेले पदार्थ खातो त्यामुळे शरीराला आराम मिळतो. त्यामुळे वजन वाढतं.

अँटीडिप्रेसन्ट औषधी : काही अँटीडिप्रेसन्ट औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे वजन वाढतं. या औषधांमध्ये काही लोकांचा मूड चांगला होतो आणि त्यांना भूक लागते. जर या औषधी घेतल्याने तुमचं वजन वाढत असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना याची माहिती द्यायला हवी. पण, स्वत:हून औषधी बंद करु नये (Obesity Causes Surprisingly).

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) : पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही महिलांमधील एक हार्मोनल समस्या आहे. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोममध्ये छोटे-छोटे सिस्ट बनतात. ज्यामुळे मासिक पाळी आनियमित होते आणि पिम्पल्सची समस्या वाढते. यामुळे पोटाच्या जवळपासची चरबीही वाढू लागते.

धुम्रपान सोडणे : धुम्रपान सोडणे आरोग्यासाठी अत्यंत चांगलं आहे. धुम्रपान सोडण्याच्या प्रक्रियेने वजन वाढतं. पण, हे अत्यंत सामान्य आहे. धुम्रपान सोडल्याच्या अनेक आठवड्यांनंतर तुम्हाला कमी भूक लागेल आणि वाढलेलं वजन कमी होईल.

Obesity Causes Surprisingly

संबंधित बातम्या :

Digestion Problem | औषधांना ‘गुडबाय’ म्हणा, अन्न पचवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक पद्धतींचे अनुसरण करा!

Health Tips | डोकेदुखीच्या समस्येने हैराण? मग, डाएटमध्ये सामील करा ‘ही’ पेय…

Happy Pregnancy Secret | गर्भवती आई आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी!

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.