Digestion Problem | औषधांना ‘गुडबाय’ म्हणा, अन्न पचवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक पद्धतींचे अनुसरण करा!

हिवाळ्यात आपली पाचक प्रणाली कमकुवत होऊ शकते. मात्र, आपल्या रोजच्या आहारात काही बदल केल्यास अपचनाची समस्या दूर होऊ शकते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:08 PM, 26 Jan 2021
Digestion Problem | औषधांना ‘गुडबाय’ म्हणा, अन्न पचवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक पद्धतींचे अनुसरण करा!
भरपूर खाल्ल्यानंतर पचन संस्था बिघडल्यामुळे अनेकांना औषध-गोळ्यांवर अवलंबून रहावं लागत.

मुंबई : हिवाळ्याचा हंगाम हा प्रत्यक्षात चमचमीत पदार्थ खाण्याचा हंगाम असतो. कधी आरोग्य, तर कधी चवीच्या बहाण्याने आपण दिवसभर काहीना काहीतरी खात असतो. या हंगामात येणारे उत्सव आणि वेगवेगळ्या पार्ट्या देखील आपल्या या सवयीला हातभार लावतात. अशावेळी भरपूर खाल्ल्यानंतर पचन संस्था बिघडल्यामुळे अनेकांना औषध-गोळ्यांवर अवलंबून रहावं लागत. मात्र, औषध किंवा पाचक गोळ्यांऐवजी आपण काही नैसर्गिक घरगुती उपाय वापरून देखील या समस्येवर मात करू शकता (Natural Home remedies for indigestion problem during winter season).

हिवाळ्याच्या हंगामात विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आळशीपणामुळे या दिवसांत आपले चालणे देखील कमी होते, ज्यामुळे अन्न पचन नीट होत नाही आणि आपल्याला बर्‍याच लहान-मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता, अतिसार, मळमळ, उलट्या होणे, पोटात जळजळ अशा काही समस्या निर्माण होतात. आपली पाचक प्रणाली अन्नाला ऊर्जेमध्ये रूपांतरित करते. परंतु हिवाळ्यात आपली पाचक प्रणाली कमकुवत होऊ शकते. मात्र, आपल्या रोजच्या आहारात काही बदल केल्यास अपचनाची समस्या दूर होऊ शकते.

हिंग

हिंग पोटाच्या अनेक प्रकारच्या समस्या सोडवते. यात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे अपचन, खराब पोट आणि गॅससारख्या समस्यांवर मात करण्यास मदत करतात. रोजच्या आहारात जर तुम्ही हिंगाचा वापर केला, तर अन्नाची चव वाढेल तसेच पोटाचे सर्व त्रासही दूर होतील.

दही

दही आपल्या पोटातील अनेक आजार दूर करू शकते. म्हणूनच त्याला अमृत म्हटले जाते. पोटात उष्णता किंवा जळजळ झाल्यास, दही किंवा दहीने बनवलेल्या लस्सीचे सेवन केल्याने आराम मिळतो. इतकेच नाही तर, दह्यापासून बनवलेले ताक दररोज सेवन केल्यास अन्न लवकर पचते. दह्यामध्ये अनेक प्रकारचे चांगले बॅक्टेरिया असतात जे आपल्या पाचक प्रणालीला बळकट करतात आणि चयापचय क्रिया सुधारतात (Natural Home remedies for indigestion problem during winter season).

आले

सर्व मसाल्यांमध्ये प्रभावशाली अँटीऑक्सिडेंट आढळतात. परंतु, त्यापैकी आले सर्वात प्रभावी ठरते. यात 25 भिन्न अँटिऑक्सिडेंटची वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अत्यंत फायदेशीर आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणात आले समाविष्ट करू शकता. आहारात आल्याचा वापर केल्याने केवळ अन्नाची चवच वाढत नाही, तर तुमची पचनशक्तीही सुधारते.

बडीशेप-ओवा चूर्ण

जेवणानंतर नियमितपाणे बडीशेप आणि ओवा पूड खा. हे चूर्ण खाल्ल्याने अन्न लवकर पचते आणि पोटासंबंधित समस्या उद्भवत नाही. बडीशेप आणि ओव्याचे चूर्ण तयार करण्यासाठी या दोन्ही गोष्टी आपल्या आवश्यकतेनुसार घ्या आणि गॅसच्या मंद आचेवर 5 मिनिटे भाजा. नंतर हे मिश्रण बारीक करा आणि इच्छित असल्यास चवीनुसार मिठ घाला. दररोज रात्री जेवणानंतर या चुर्णाचे सेवन केल्याने पाचन क्रिया निरोगी राहते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Natural Home remedies for indigestion problem during winter season)

हेही वाचा :