Patanjali: पतंजलीचे खास दिव्य कायाकल्प तेल, ‘या’ गंभीर समस्यांवर रामबाण उपाय
पतंजलीचे दिव्य कायाकल्प तेल या सर्व समस्यांवर एक आयुर्वेदिक उपाय आहे. हे तेल त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवते असा दावा पतंजलीने केला आहे.

पतंजलीची औषधे ही अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी, डाग, कोरडी त्वचा, एखादी जखम, सनबर्न, खाज यापैकी एखादी समस्या असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पतंजलीचे दिव्य कायाकल्प तेल या सर्व समस्यांवर एक आयुर्वेदिक उपाय आहे. हे तेल त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवते असा दावा पतंजलीने केला आहे.
आयुर्वेदानुसार औषधी वनस्पतींपासून तयार करण्यात आलेली औषधे आणि तेल हे कोणत्याही समस्येवर नैसर्गिक उपचार मानले जाते. अशाच या नैसर्गिक पद्धतींचा वापर करून पतंजलीने दिव्य कायाकल्प तेल बनवले आहे. त्याचे फायदे, ते वापरण्याच्या पद्धती आणि खबरदारी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दिव्य कायाकल्प तेलातील औषधी वनस्पती
दिव्य कायाकल्प हे तेल तयार करण्यासाठी बाबची, पुनर्नव, हरिद्रा, दारुहरिद्रा, करंज, कडुनिंब, आमलकी, मंजिष्ठा, गिलोय, चित्रक, कुटकी, देवदारू, चिरायता यासारख्या अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करण्यात आलेला आहे.
दिव्य कायाकल्प तेलाचे फायदे
दिव्य कायाकल्प हे त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. यात खाज सुटणे, सोरायसिस, एक्जिमा, दाग, सोरायसिस, अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी, पांढरे डाग आणि त्वचेची ऍलर्जी या समस्यांचा समावेश आहे. तसेच हे तेल सनबर्न, फ्रिकल्स, रॅशेस, फंगल इन्फेक्शन यासारख्या समस्यांवरही प्रभावी आहे. त्याचबरोबर लहान जखमा आणि भेगा पडलेल्या टाचांसाठीएक उत्तम आयुर्वेदिक उपाय आहे.
दिव्य कायाकल्प तेल कसे वापरायचे?
शरीराच्या ज्या भागात समस्या आहे अशा भागाला दिवसातून 2 ते 3 वेळा हलक्या हातांनी मालिश करावी. या तेलाने नियमित मालिश केल्याने त्वचा मऊ, निरोगी आणि स्वच्छ दिसेल आणि समस्या दूर होईल.
तेल वापरताना काय खबरदारी घ्यावी?
दिव्य कायाकल्प तेल किंवा इतर कोणतेही नवीन औषध किंवा तेल वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करावी. यामुळे औषध किंवा तेलामुळे तुम्हाला त्रास तर होत नाही ना हे कळेल. हे तेल वापरण्यापूर्वी गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच मुलांवर या तेलाचा वापर करतान त्याचे प्रमाण कमी ठेवावे.
टीप – तुम्हाला हे तेल वापरायचे असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांना न विचारता याचा वापरू करु नका.
