AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला आणि पुरुषांनो, तुम्ही या समस्येमुळे निराश आहात का? आयुर्वेदात रामबाण इलाज; रिसर्चचा दावा काय?

आजच्या काळात वाढत्या वंध्यत्वाच्या समस्येवर पतंजली आयुर्वेद प्रभावी उपचार सांगते. अश्वगंधा, शतावरी चूर्ण, आणि दिव्य औषधे यात प्रमुख आहेत. हे औषधे हार्मोनल असंतुलन कमी करून प्रजननक्षमता वाढवतात. तथापि, या औषधांचा वापर करण्यापूर्वी आयुर्वेदिक तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक आहे. नियमित योग, प्राणायाम आणि संतुलित आहारही उपचारात महत्त्वाचे आहेत.

महिला आणि पुरुषांनो, तुम्ही या समस्येमुळे निराश आहात का? आयुर्वेदात रामबाण इलाज; रिसर्चचा दावा काय?
Patanjali Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2025 | 6:57 PM
Share

आजच्या काळात वेगानं जीवनशैली बदलत आहे. अनियमित खाणंपिणं आणि शरीरातील हार्मोनच्या बदलामुळे अनेक जोडप्यांना वंध्यत्वाचा (इनफर्टिलिटी) सामना करावा लागत आहे. मेडिकल सायन्समध्ये त्यावर उपचार आहे. पण लोक नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपचारांकडे अधिक जात आहेत. पतंजली आयुर्वेदाने या दिशेने एक पाऊल टाकत अनेक चांगली औषधे सांगितली आहेत. या औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये, मात्र समस्येचं समाधान खात्रीलायक होत आहे. पतंजली रिसर्च सेंटर हरिद्वारने वंध्यत्वावर रिसर्चही केला आहे. यात काही औषधे फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. औषधांची माहिती घेण्यापूर्वी वंध्यत्व कशामुळे येते हे जाणून घेऊया.

वंध्यत्व येण्यामागे असंख्य कारणं असू शकतात. हार्मोनल असंतुलन ही त्यातील एक मुख्य समस्या आहे. महिलांमध्ये अनियमित पीरिड्स वा पीसीओडीची समस्या अधिक असते. त्यामुळे वंध्यत्वाची समस्या वाढू शकते. महिला आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या घटू लागते. अत्याधिक तणाव आणि डिप्रेशन सुद्धा याचं एक कारण असू शकतं. वाढतं वजन किंवा अत्यंत कमी वजन असणं हे सुद्धा यामागचं एक कारण असू शकतं. थायरॉइड वा डायबिटीज सारखे आजार, नशा करणं म्हणजे स्मोकिंग, दारू पिणं आणि वाढतं वय हे सुद्धा या मागे एक कारण असतं.

पतंजलीचं औषध फायदेशीर

पतंजलीच्या रिसर्चमधून असंख्य गोष्टी समोर आल्या आहेत. अश्वगंधा चूर्ण वंध्यत्वाच्या उपचारासाठी फायदेशीर होऊ शकतं, असं हे रिसर्च सांगतं. अश्वगंधा पुरुषातील शुक्राणूंची गुणवत्ता आणइ संख्या वाढवण्यासाठी मदत करते. महिलांसाठीही हे ओव्हूलेशनला रेग्युलर करते.

शतावरी चूर्ण

शतावरी चूर्ण महिलांसाठी वरदान असल्याचं सांगितलं जातं. यामुळे गर्भधारणेची शक्यता अधिक असते. यूट्रसला मजबूत करते. हार्मोनल असंतुलनला नियंत्रित करण्याचं काम करते.

दिव्य पुष्पांजली क्वाथ

हा एक विशेष प्रकारचा काढा महिलांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आणि मासिक धर्माशी संबंधित समस्या ठिक करण्यासाठीही मदत करतो.

दिव्य चंद्रप्रभा वटी

हे औषध पुरुष आणि महिलांसाठी लाभकारक आहे. यामुळे शरारीतील विषारी तत्त्व बाहेर फेकले जातात आणि शारीरिक कमजोरी दूर केली जाते.

दिव्य यौवनामृत वटी

या औषधाने पुरुषातील वंधत्वाशी संबंधित समस्या म्हणजे शुक्राणूंची कमी आणि कमजोरी दूर करण्यास मदत करते.

पतंजलीचा सल्ला काय?

पतंजली केवळ औषधच नव्हे तर जीवनशैलीच्या बदलावरही जोर देते. स्वामी रामदेव यांनीही वंध्यत्व दूर करण्यासाठी नियमित योग आणि प्राणायाम करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. खासकरून कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भस्त्रिका सारखे प्राणायाम प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी मदत करत असतात. त्याशिवाय आहारात भाज्या, सीजनल फळं, सुकामेवा, तूप आणि दूध डाएटमध्ये घेतले पाहिजे. तळलेले, भाजलेले पदार्थ, जंकफूड आणि अधिक मसालेदार पदार्थांचं सेवन टाळलं पाहिजे. जास्तीत जास्त पाणी घ्या आणि शरीराला डिटॉक्स करा.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

पतंजलीचे औषधे नैसर्गिक असतात. पण औषधे सुरू करण्यापूर्वी आयुर्वेदाचार्य किंवा डॉक्टरांची सल्ला घेणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला योग्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळेल.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.