AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghabadkund : ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर मराठी सिनेविश्वात ‘अच्छे दिन’, ‘घबाडकुंड’ची 5 दिवसांत बक्कळ कमाई

Ghabadkund Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा मराठी सिनेविश्वात 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा पहिला सिनेमा ठरला आहे. त्यानंतर 'देऊळ बंद 2' सिनेमाने देखील मोठी मजल मारली. आणि सर्वत्र फक्त आणि फक्त 'घबाडकुंड' सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Ghabadkund : 'राजा शिवाजी' सिनेमानंतर मराठी सिनेविश्वात 'अच्छे दिन', 'घबाडकुंड'ची 5 दिवसांत बक्कळ कमाई
Ghabadkund
| Updated on: Jun 25, 2026 | 11:31 AM
Share

Ghabadkund Box Office Collection : सस्पेंस थ्रिलर मराठी ‘घबाडकुंड’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हापासूनच प्रेक्षक सिनेमाच्या प्रतिक्षेत होते. अखेर ‘घबाडकुंड’ सिनेमा 19 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच सिनमाने बक्कळ कमाई करण्यास सुरुवात कलेली आहे. प्रेक्षकांकडून देखील सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे… सिनेमात संदीप पाठक, देवदत्त नागे, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर यांसारख्या लोकप्रिय कालाकारांनी भूमिका साकरल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर, फक्त 6 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला ‘घबाडकुंड’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे… तर जाणून घ्या सिनेमाने पाच दिवसांत किती कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘घबाडकुंड’ सिनेमाचं पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘घबाडकुंड’ सिनेमाने पाचव्या दिवशी 43 लाख रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशी या सिनेमाने 42 लाख रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत वाढ होऊन 76 लाख रुपयांचा गल्ला सिनेमाने जमवला. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 1.25 कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी सिनेमाची कमाई 49 लाख रुपये इतकी होती. या सिनेमाने एकूण 3.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजे सिनेमाने आतापर्यंत 55.83 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘घबाडकुंड’ सिनेमाचं दिग्दर्शन प्रीतम एसके पाटील यांनी केलं आहे. तर सिनेमाची निर्मिती रसिक कदम यांनी केली आहे. तर सिनेमात अहमद देशमुख, कुशल बद्रीके, प्रवीण डाळिंबकर, वैष्णवी कल्याणकर, आरोही भोईर, साहिल अन्नालदेवर आणि स्मिता पेगुडे यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेमा माऊथ पल्बिसीटीच्या माध्यमातून देखील लोकांपर्यंत पोहोचत आहे..

‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर मराठी सिनेविश्वाला ‘अच्छे दिन’

अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 130 कोटी रुपयांचा गल्ला पार केला. 100 कोटी रुपयांचा गल्ला पार करणारा ‘राजा शिवाजी’ सिनेमा मराठी सिनेविश्वातील पहिला सिनेमा ठरला आहे. त्यानंतर ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने देखील तगडी कमाई केली. फक्त 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने जगभरात 90 कोटींची कमाई केली. एवढंच नाही तर, ‘तुम्बाडची मंजुळा’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील पकड मजबूत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा