AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी भीमराव कांबळे दोषी, न्यायालयात काय घडले? आता शिक्षा कधी?

Narsapur case Accused Bhimrao Kamble: नसरापूर लहान मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिच्या हत्याप्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने दोषी ठरवले आहे. आताच कोर्टातील ही अपडेट समोर आली आहे.

नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी भीमराव कांबळे दोषी,  न्यायालयात काय घडले? आता शिक्षा कधी?
नरसापूर लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे दोषीImage Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Jun 25, 2026 | 12:18 PM
Share

 Narsapur case Accused Bhimrao Kamble: पुण्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने दणका दिला. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. 1 मे 2026 रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. प्राथमिक तपासात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला होता. नंतर तिचा निर्घृण खून केला होता. शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिचा मृतदेह लपवला होता. सीसीटीव्ही आधारे आरोपी भीमराव कांबळे याला पकडण्यात आले होते.  ताज्या अपडेटनुसार, आरोपीला शिक्षा देण्याचा निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. याप्रकरणात 29 जून रोजी निकाल येणार आहे.  आरोपीला चार दिवसानंतर 29 जून रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

नसरापूर प्रकरणात जलदगतीने सुनावणी

नसरापूर साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणात जनआक्रोशानंतर तातडीने खटला जलदगतीने चालवण्यात आला. गुरुवारी 25 जून रोजी या खटल्याचा निकाल समोर आला आहे. न्यायालयीने इतिहासात या खटल्याची जलदगतीने सुनावणी झाल्याचे समोर आले. प्रकरणात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (65) याला अटक करण्यात आली होती. आज पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात निकाल समोर आला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या नराधमाला याप्रकरणात दोषी ठरवले.

विशेष न्यायालयात नेमकं काय घडलं?

अंतिम सुनावणी न्यायालयाने आरोपी भिमराव कांबळे याला तुला कोणती शिक्षा द्यायची, फाशीची की जन्मठेपेची, अशी विचारणा केली. त्यावर मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो, त्या मुलीच्याही डोक्याला मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ती सारखी ओरडत असल्याचा बनाव केला. त्यावर विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी त्याला तू जे सांगत आहे, तो इतिहास झाला आहे, तुझ्यावर आता गुन्हा सिद्ध झाला आहे, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने कोणतेच उत्तर दिले नाही.

नसरापूर हत्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळे याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवले.

विविध कलमाखाली हा खटला चालला. आरोपींवरील सर्व गुन्हे सिद्ध झाले.

दोन गुन्ह्यात त्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.

एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा, तर एका कलमाखाली आजन्म जन्मठेपेची शिक्षा

आरोपी भिमराव कांबळेला मृत्यूदंडाची शिक्षा द्या

भिमराव कांबळे हा नसरापूर खून खटल्यात दोषी ठरला आहे. आता त्याला कोर्ट थोड्याच वेळात शिक्षा ठोठावेल. दोन्ही बाजूंनी युक्तीवाद करण्यात आला. भिमराव कांबळे ने त्या निष्पाप जीवासोबत 39 मिनिटे अतिशय घृणास्पद कृत्य केले आहे. वैद्यकीय तपासणीत कांबळे याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याचे म्हणणे सरकारी वकिलांनी मांडले. तर सरकारी वकिलांनी आरोपी कांबळेला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची विनंती केली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा न दिल्यास तो असे कृत्य करण्याची भीती असल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाने केला.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!