Health : महिलांनो या कारणामुळेही गळतात केस, वेळीच लक्ष द्या नाहीतर पडू शकतो टक्कल, जाणून घ्या

केसगळतीमुळे महिला नेहमी त्रस्त असतात. त्यात बहुतेक महिलांना PCOD, PCOS चा त्रास असतो. तर अनेकांना माहिती नसेल की PCOD, PCOS मुळे केस गळती होते.

Health : महिलांनो या कारणामुळेही गळतात केस, वेळीच लक्ष द्या नाहीतर पडू शकतो टक्कल, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 7:03 PM

मुंबई : सध्याच्या काळात बदलती जीवनशैली, प्रदुषण, ताण-तणाव अशा अनेक गोष्टींमुळे केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसते. आजकाल तर बहुतेक लोकांना केसगळतीची समस्या सतावत असते. यामध्ये मग महिलांना केसगळतीचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. आजच्या काळामध्ये अनेक मुलींना PCOS, PCOD चा त्रास असतो यामुळे बहुतेक मुलींना मासिक पाळी नियमित होत नाही. अशावेळी दोन ते तीन महिन्यानंतर महिलांना मासिक पाळी येत असते.

पीसीओएसमुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये वजन वाढणे, चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, केस गळणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यात गर्भधारणाशी संबंधित देखील समस्या निर्माण होताना दिसतात. यामध्ये पीसीओएसमुळे महिलांचे केस मोठ्या प्रमाणात गळतात मग टक्कल देखील पडण्याची शक्यता असते.

पीसीओएसचा त्रास असलेल्या महिलांमध्ये एंड्रोजन हार्मोन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. पण हे हार्मोन्स महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असतात. पण पीसीओएसमध्ये हार्मोन्स महिलांच्या शरीरात वाढतात तेव्हा त्यांच्या डोक्यावरचे केस गळायला लागतात.

पीसीओएसमुळे महिलांच्या शरीरातील हार्मोनलचे असंतुलन खूप वाढते. याचा परिणाम पीरियड सायकलवर होत असतो. हार्मोन्सचे संतुलन इतके बिघडते की महिलांच्या केसांना पुरेसे पोषण मिळत नाही. त्यामुळे महिलांचे केस पातळ होतात आणि केस गळतीची समस्या निर्माण होते.

केस गळतीच्या या समस्येपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर, तुमच्या आहारामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, कॅल्शियम असलेल्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच बाहेरचे पदार्थ खाणे टाळायला हवे. सोबतच प्रत्येकाने व्यायाम, योगासने करणे गरजेचे आहे. जर तुमचे वजन वाढले असेल तर तुमचं अतिरिक्त वजन कमी करणे गरजेचे आहे. कारण वाढलेले वजन तुमचे असंतुलित हार्मोन्स बदलते आणि याचा तुमच्या केसांवर परिणाम होतो. त्यामुळेच फिट राहणं खूप गरजेचं आहे.

'वांद्रे आता सुरक्षित नाही, '...काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?
'वांद्रे आता सुरक्षित नाही, '...काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?.
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ.
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड....
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या.
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं.
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर.
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार.
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा.
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर.
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?.