Health | उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी या पदार्थांचा आहारात अजिबात समावेश करू नये!

ब्रेड खाणे अनेकांना आवडते. ब्रेड पकोडा म्हटंले की, अनेकांच्या तोंडाला पाणी येते. अनेकांना नाश्त्यात ब्रेडसोबत बटर खायला आवडते. ब्रेड हे मैद्यापासून तयार केले जाते. यामुळेच हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, त्यामुळे वजन तर वाढतेच पण त्यामुळे साखरही वाढते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते.

Health | उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी या पदार्थांचा आहारात अजिबात समावेश करू नये!
Image Credit source: insider.com
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 2:19 PM

मुंबई : उच्च रक्तदाब (High blood pressure) डोक्याचे टेन्शन चांगलेच वाढवतो आहे. उच्च रक्तदाबाच्या रूग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढते आहे. उच्च रक्तदाबाला हायपरटेन्शन असेही म्हणतात. सध्या बहुतेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित समस्या (Problem) उद्भवू शकतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपण निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहाराचे पालन करूण ही समस्या वेळीच कमी करू शकतो. अधिक तळलेले, अधिक गोड आणि इतर अनेक पदार्थ (Food) खाल्ल्यामुळे देखील समस्या वाढू शकते. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सकस अन्नाचा आहारामध्ये समावेश करावा.

ब्रेड

ब्रेड खाणे अनेकांना आवडते. ब्रेड पकोडा म्हटंले की, अनेकांच्या तोंडाला पाणी येते. अनेकांना नाश्त्यात ब्रेडसोबत बटर खायला आवडते. ब्रेड हे मैद्यापासून तयार केले जाते. यामुळेच हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, त्यामुळे वजन तर वाढतेच पण त्यामुळे साखरही वाढते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते.

कॉफी

कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तदाब वाढतो कॅफीन आणि साखर रक्तदाब वाढवण्याचे काम करते, त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांना एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी कॅफिनचे कमी सेवन करावे.

मीठ

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, बाहेरील खाद्यपदार्थांमध्ये मिठाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळेच उच्च रक्तदाब असलेल्यांनी आपल्या आहारामध्ये बाहेरील खाद्यपदार्थांचा आहारामध्ये समावेश कमी करावा. हिरव्या भाज्या, फळे जाते अन्न यांचा आहारामध्ये समावेश करावा.

मांस

प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. यामुळेच ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, अशांनी प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळाच, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आणि घातक असते.