AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travelling Tips : गरोदरपणात प्रवास करताय ? या गोष्टींची जरूर घ्या काळजी

गरोदरपणात महिलांना स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी लागते. महिलांसाठी हा आनंदाचा पण तेवढाच आव्हानांचाही काळ असतो. काही महिला गर्भधारणेदरम्यान प्रवास करतात. त्यावेळी विशेष काळजी घ्यावी.

Travelling Tips : गरोदरपणात प्रवास करताय ? या गोष्टींची जरूर घ्या काळजी
Image Credit source: freepik
| Updated on: Nov 04, 2023 | 3:39 PM
Share

Travelling in Pregnancy : गर्भधारणा (Pregnancy ) हा निःसंशयपणे स्त्रियांसाठी आनंदाचा काळ असतो, परंतु अशा वेळी खूप काळजी घेणे आवश्यक असते. आईच्या प्रत्येक कृतीचा पोटातील बाळावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे या काळात शरीराची, आरोग्याची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेण्याची गरज असते. तसेच बरीच खबरदारीही घ्यावी लागते. गरोदरपणात महिलांनी खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते उठण्या-बसण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते.

त्याच वेळी, जर गरोदरपणात महिलांना प्रवास करावा लागणार असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय महत्वाचे असते. गरोदर असताना प्रवास करणे योग्य की अयोग्य, त्यावेळी काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

कधी करावा प्रवास ?

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रवास करावा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. हा प्रवास करण्याचाही एक सुरक्षित मार्ग आहे. पण जर एखाद्या महिलेला गर्भधारणेदरम्यान खूप समस्या येत असतील तर तिला कुठेतरी प्रवास करण्यास मनाई केली जाऊ शकते, असे डॉक्टर सांगतात. अशा परिस्थितीत महिलेने ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्यांना दाखवावे, तपासणी करावी. पहिल्या तिमाहीत गर्भपात होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा स्थितीत दुसरा त्रैमासिक म्हणजेच ३ ते ६ महिन्यांचा काळ हा गरोदर महिलेच्या प्रवासासाठी चांगला मानला जातो.

तिसरी तिमाही सुरक्षित

सकाळी उठल्यावर होणाऱ्या उलट्या, डोकेदुखी आणि मॉर्निंग सिकनेस याचा त्रास तिसऱ्या तिमाहीमध्ये कमी होता. तेव्हा मूडही चांगला असतो आणि तेव्हा गरोदर महिलांची मनस्थिती चांगली असते.

हे नक्की करा

पण गरोदर असताना कोणत्याही प्रकारच्या सहलीचे अथवा प्रवासाचे प्लानिंग करताना तुमच्या डॉक्टरांचा सल् घेतला पाहिजे आणि आवश्यक त्या सर्व तपासण्या केल्या पाहिजेत. तसेच प्रवास करताना घ्यायची महत्त्वाची सुरक्षा, काळजी आणि खबरदारी जाणून घ्या. प्रसूतीची तारीख आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रेग्नन्सी रिपोर्ट्स याची एक प्रत नेहमी जवळ बाळगावी.लसीकरण आणि औषध याबद्दलही संपूर्ण माहिती घेऊन त्याची नोंद ठेवावी.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.