AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सिरींज-निडल’ वारंवार वापरणे ठरते धोकादायक… नकळत होऊ शकतात ‘हे’ 3 गंभीर आजार; करा स्वतःचे संरक्षण!

संसर्गजन्य आजार वाढल्याने, आज काल सर्वांनाच कधीना कधी सिरींज-सुई (Syringe-Needle) ची आवश्यकता भासतेच. परंतु, ही सिरींज निडल वारंवार वापरणे धोकादायक ठरू शकते. वापर झालेल्या सिरींज-निडल मुळे हे 3 गंभीर आजार होऊ शकतात.

‘सिरींज-निडल’ वारंवार वापरणे ठरते धोकादायक… नकळत होऊ शकतात ‘हे’ 3 गंभीर आजार; करा स्वतःचे संरक्षण!
‘सिरींज-निडल’ वारंवार वापरणे ठरते धोकादायकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 31, 2022 | 8:33 PM
Share

लसीकरणासाठी (Vaccination) प्रत्येक वेळी नवीन सिरींज-निडल (A new syringe-needle) वापरण्याचे आरोग्य विभागाचे निर्देश आहेत. लसीकरणासाठी भारतात सिंगल युज सिरींज आणि निडल्स्‌-सुया वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण अलीकडेच मध्य प्रदेशातील एका आरोग्य अधिकाऱ्याने 30 विद्यार्थ्यांना एकाच सिरींजने लस टोचल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला अन् एकच खळबळ उडाली. सागर जिल्ह्यातील एका शाळेत ही घटना घडली जिथे मुलांना कोविड-19 ची लस दिली जात होती. सामान्यतः आता सर्वांनाच इंजेक्शनच्या सुया पुन्हा वापरण्याच्या धोक्यांबद्दलच माहिती आहेच. परंतु, सिरींजचा पुन्हा वापर करणे देखील धोकादायक आहे. हे फार कमी लोकांना माहीत आहे. मात्र, या दोन्हींचा पुनर्वापर गंभीर (Recycling is critical) आजारांना आमंत्रण देऊ शकतो. कारण निडल्स्-सुया आणि सिरींज रुग्णाच्या रक्त आणि शरीरातील द्रव किंवा इतर संसर्गजन्य सामग्रीच्या (infectious material) संपर्कात आल्याने त्या दूषित होतात.

नवीन धोरण अंमलात

एकाच सिरींज किंवा निडल्स्‌-सुईचा वापर एकापेक्षा जास्त व्यक्तींना इंजेक्शन देण्यासाठी केल्याने जगभरात अनेक प्राणघातक संसर्गजन्य रोगांचा प्रसार वाढत आहे. या कारणांमुळे, असुरक्षित इंजेक्शनच्या व्यापक समस्येला सामोरे जाण्यासाठी सर्वच देशांना मदत करण्यासाठी WHO ने इंजेक्शन सुरक्षिततेवर एक नवीन धोरण अंमलात आणले आहे. त्यामुळे होणाऱ्या आजारांचा संसर्ग रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.

सिरींज आणि सुई पुन्हा का वापरू नये

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, सुया किंवा सिरींजचा पुन्हा वापर केल्याने रुग्णांना रक्तजन्य रोग पसरण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत हिपॅटायटीस सी(Hepatitis C), हिपॅटायटीस बी(Hepatitis B) आणि एचआयव्हीचा(HIV)प्रसार होऊ शकतो.

हिपॅटायटीस सी(Hepatitis C) कधी होतो?

हिपॅटायटीस सी हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे यकृताला जळजळ होते. काहीवेळा ही स्थिती इतकी गंभीर पातळीवर पोहचते की यकृताचे नुकसान होऊ लागते. हिपॅटायटीस सी विषाणू (HCV) दूषित रक्ताद्वारे पसरतो.

हिपॅटायटीस बी (Hepatitis B)कसा पसरतो?

हिपॅटायटीस बी हा विषाणू (HBV) मुळे होणारा आजार आहे. हिपॅटायटीस-बी हा विषाणूंचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे रक्त, वीर्य किंवा इतर शरीरातील द्रव संक्रमित नसलेल्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा पसरतो. बहुतेक रुग्णांना कोणतीही विशिष्ट लक्षणे जाणवत नाहीत. त्याच वेळी, काही लोकांना कावीळ, पिवळी-दाट लघवी, अत्यंत थकवा, मळमळ, उलट्या आणि ओटीपोटात दुखणे यासारखी लक्षणे जाणवतात.

एचआयव्ही म्हणजे काय?

मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. दीर्घकाळ उपचार न केल्यास एड्स (अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम) होऊ शकतो. त्यावर सध्या कोणताही प्रभावी उपचार नाही. एकदा का एचआयव्ही झाला की, त्यांना या आजारांसह पूर्ण जिवन जगावे लागते. परंतु योग्य वैद्यकीय उपचारांनी एचआयव्ही नियंत्रित करता येतो.

लाखो लोकांना सिरींज-सुई मुळे झालीय लागण

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या 2014 च्या अभ्यासानुसार, 2010 मध्ये असुरक्षित इंजेक्शन्समुळे 1.7 दशलक्ष लोकांना हिपॅटायटीस बी, 315,000 लोकांना हिपॅटायटीस सी आणि 33,800 हून अधिक लोकांना HIV विषाणूंची लागण झाली होती.

वापरलेल्या सिरींज-सुईपासून संसर्ग कसा टाळावा

रुग्णांनी त्यांच्याबरोबर सुया किंवा सिरींजचा पुन्हा वापर न करण्याची आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी औषधांच्या बॉटल्स्‌चा दुरुपयोग न करण्याची काळजी घ्यावी. तसेच आरोग्य सेवकांनी (डॉक्टर, परिचारिका आणि इंजेक्शन देणारे कोणीही) सुई किंवा सिरींजचा पुन्हा वापर करू नये किंवा रुग्णांकडून रुग्णाकडे बॉटलमधून औषध काढू नये. एकदा वापरल्यानंतर सुई आणि सिरींज दोन्ही टाकून द्याव्यात. सुई बदलणे आणि सिरींज पुन्हा वापरणे सुरक्षित नाही. या पद्धतीमुळे रोगाचा प्रसार होऊ शकतो.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.