Rice Water | केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारेल ‘तांदळाचे पाणी’, वाचा याचे फायदे…

बर्‍याच वेळा भांड्यात भात शिजवताना आपण उरलेले पाणी टाकून देतो. परंतु, हे पाणी आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

Rice Water | केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारेल ‘तांदळाचे पाणी’, वाचा याचे फायदे...
तांदळाचे पाणी
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 11:07 AM

मुंबई : बर्‍याच वेळा भांड्यात भात शिजवताना आपण उरलेले पाणी टाकून देतो. परंतु, हे पाणी आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर, ते फेकण्याऐवजी रोजच्या आहारात समाविष्ट केले, तर ते बर्‍याच प्रकारच्या समस्या दूर करू शकते. याशिवाय केस आणि चेहऱ्यावर त्याचा उपयोग केल्याने बर्‍याच समस्यांपासून आराम मिळतो. चला तर, त्याच्या सर्व फायद्यांविषयी जाणून घेऊया…(Rice Water is good for health, skin and hairs)

‘तांदळाच्या पाण्या’चे फायदे :

– हंगामी संसर्ग किंवा विषाणूजन्य तापादरम्यान तांदूळ पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि ताप देखील कमी होतो. उन्हाळ्यात तांदळाचे पाणी पिण्याने डिहायड्रेशन होत नाही.

– तांदळाचे पाणी बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते, पाचक प्रणाली सुधारते आणि चयापचय दर वाढवते.

– तांदळाच्या पाण्यात भरपूर कार्बोहायड्रेट असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करतात. तसेच, शरीरास संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करतात.

– तांदूळाचे पाणी हे एक उत्तम कंडीशनर देखील आहे. शॅम्पूनंतर केसांवर ते कंडिशनर म्हणून वापरा. यामुळे केसांची लवचिकता आणि केसांची गुणवत्ता सुधारते.

– केस गळतीमुळे केस वाढत नाहीत किंवा इतर समस्या उद्भवत असतील, तर तांदळाचे पाणी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये असणारे अमीनो आम्ल केस गळण्यास प्रतिबंधित करतात. तांदळामध्ये व्हिटामिन बी, सी आणि ई आढळतात, जे केसांची वाढ सुधारण्यास उपयुक्त ठरतात. आठवड्यातून दोनदा डोके धुल्यानंतर तांदळाचे पाणी वापरा, काही दिवसांत फरक दिसून येईल (Rice Water is good for health, skin and hairs).

– हे पाणी त्वचेसाठी चांगले क्लीन्झर आणि टोनर म्हणून देखील काम करते. सुरकुत्यापासून चेहऱ्याचे संरक्षण करते. यासाठी तांदळाचे पाणी कॉटन बॉलमध्ये घ्या आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवा.

– मुरुमांच्या समस्येमध्ये देखील तांदळाचे पाणी फायदेशीर आहे. हे मुरुमांचा लालसरपणा, सूज आणि खरुज काढून टाकते आणि नवीन मुरुमांना तयार होण्यापासून प्रतिबंध करते. रात्री झोपताना दररोज चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा.

तांदळाचे पाणी कसे तयार कराल?

एका भांड्यात तांदूळ आणि त्यापेक्षा दुप्पट पाणी घाला आणि उकळवा. उकळल्यानंतर भांडे मंद आचेवर झाकून ठेवा आणि थोडावेळ पाणी उकळू द्या. यानंतर, एक भात एका चमच्याने बाजूला काढा आणि तो व्यवस्थित शिजला आहे की, नाही ते तपासा. शिजल्यानंतर भात चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या व एका भांड्यात ते पाणी काढून घ्या. हे पाणी केसांवर किंवा त्वचेवर वापरा. हे पाणी प्यायचे असल्यास, त्यात थोडे तूप आणि मीठ घाला आणि नंतर प्या.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Rice Water is good for health, skin and hairs)

हेही वाचा :

Soybean Face pack | चमकदार त्वचेसाठी वापरा सोयाबीनचा फेसपॅक, दूर होतील त्वचेच्या अनेक समस्या…

Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.