Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!

आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागले, तर त्याचा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दिसून येतो. मधुमेहामुळे डोळ्याचे अनेक आजार जसे मोतीबिंदू, काळा मोतीबिंदू आणि मॅक्युलर एडेमा हे आजार होऊ शकतात.

Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!
केस गळती

मुंबई : जर तुम्हाला असे वाटत असेल की, मधुमेह हा केवळ साखरेशी संबंधित एक रोग आहे, तर असे नाही. हा अनेक रोगांचे मूळ आहे. जर, आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागले, तर त्याचा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दिसून येतो. मधुमेहामुळे डोळ्याचे अनेक आजार जसे मोतीबिंदू, काळा मोतीबिंदू आणि मॅक्युलर एडेमा हे आजार होऊ शकतात. मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो. तसेच, शिरा आणि रक्तवाहिन्यांना देखील हानी होते. मधुमेह झाल्यामुळे हृदयरोग देखील होऊ शकतो. पण, तुम्हाला माहिती आहे का की, मधुमेहामुळे केस गळण्याची समस्या देखील उद्भवू शकते (High Blood sugar or diabetes can cause hair loss).

ऑक्सिजन आणि पोषक घटक केसांच्या मुळापर्यंत पोहोचत नाहीत!

दिल्लीच्या हेअर अँड स्कीन एक्स्पर्ट डॉक्टर शेहला अग्रवाल यांनी या संदर्भात माहिती दिली. डॉ.शेहला यांच्या म्हणण्यानुसार, रक्तातील उच्च साखरेमुळे रक्तवाहिन्या खराब होऊ लागतात. रक्तवाहिन्यांच्या नुकसानीमुळे रक्त परिसंचरण मर्यादित होते, ज्यामुळे काही पेशींना ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक द्रव्य प्रमाणापेक्षा कमी मिळतात. हेअर फॉलिकल्समध्येही असेच घडते.

जेव्हा केसांच्या रोमांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळत नाहीत, तेव्हा केसांची सामान्य वाढ दिसून येते. तसेच, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सामान्य लोकांपेक्षा केस गळतीची समस्या अधिक असते. केस पुन्हा वाढतात तरीही, सामान्य केसांच्या वाढीच्या तुलनेत त्यांची वाढ प्रक्रिया खूपच हळू असते (High Blood sugar or diabetes can cause hair loss).

मधुमेहामुळे अलोपेसिया रोग

डॉ. शेहला पुढे नमूद करतात की, मधुमेह असलेल्या काही रुग्णांमध्ये, केसांचा अलोपेसिया एरीएटा हा आजार होण्याची शक्यताही असते. अलोपेसिया हा एक ऑटोम्यून्यून रोग आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती केसांच्या फोलिकल्सवर हल्ला करण्यास सुरुवात करते. ज्यामुळे डोक्याच्या वेगवेगळ्या भागांमधून केस गळतात. तथापि, डॉ. शेहला यांच्या म्हणण्यानुसार, आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवल्यास केस गळण्याची समस्या देखील आपोआप कमी होते.

मधुमेहाची सामान्य लक्षणे कोणती?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह होतो, तेव्हा एकतर त्याच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही किंवा शरीरात तयार केलेले इन्सुलिन वापरण्यास ते अक्षम आहे किंवा या दोन्ही समस्या असू शकतात. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे ग्लूकोज शरीराच्या पेशींमध्ये पोहोचत नाही आणि ऊर्जा स्त्रोतासाठी शरीराला ऊती, स्नायू आणि इतर अवयवांवर अवलंबून रहावे लागते. वारंवार भूक, उर्जेची कमतरता, नेहमीपेक्षा जास्त तहान, वारंवार लघवी ही सर्व रक्तातील उच्च साखरेची लक्षणे आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

(टीप : अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(High Blood sugar or diabetes can cause hair loss)

हेही वाचा :

Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI