
भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर आणि माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा सानिया चंदोक हिच्याशी झाला आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची ती नात आहे. एका खासगी कौटुंबिक कार्यक्रमात दोघांचा साखरपुडा झाला. या कार्यक्रमात अगदी मोजकीच जवळची माणसं होती. अर्जुन हा त्याच्या उंचीसाठी ओळखला जातो. आई-वडीलांपेक्षा त्यांची उंची जास्त आहे. त्यामागे हे खास पदार्थ आहेत.
25 वर्षांचा अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा फलंदाज आणि वेगवान गोलंदाज आहे. तो ऑलराऊंडर म्हणून प्रसिद्ध आहे. तो यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. सानिया चंदोक ही सार्वजनिक कार्यक्रमात जास्त दिसत नाही. ती मुंबईतील एका मोठ्या उद्योजक कुटुंबाशी संबंधित आहे. घई कुटुंब हे हॉस्पिटॅलिटी आणि फुड इंडस्ट्रीजमधील मोठे नाव आहे. सानियाचे आजोबा रवी इकबाल घई हे ग्रेविस हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे अध्यक्ष आहेत.
अर्जुनची उंची चर्चेचा विषय
अर्जुन तेंडुलकरची उंची हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. अर्जुनची उंची ही 6 फूट 3 इंच इतकी आहे. तर त्याचे वडील, सचिन तेंडुलकर यांची उंची ही जवळपास 5 फूट 5 इंच आहे. त्याची आई अंजली तेंडुलकर यांची उंची 5 फूट 4 इंच इतकी आहे. त्यामुळे या दोघांपेक्षा अर्जुनची इतकी उंची जास्त कशी, तो काय खातो, त्याचे डाएट प्लॅन काय, त्याने उंची वाढवण्यासाठी काय वर्कआऊट केले या चर्चा नेहमी होतात.
HGH इंजेक्शनने वाढली उंची?
काही लोकांच्या मते, अर्जुन याने उंची वाढवण्यासाठी ह्युमन ग्रोथ हार्मोन (HGH) इंजेक्शनचा वापर केला असावा. पण याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अथवा पुरावा समोर आलेला नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते, लहानपणापासूनच पोषक तत्वे, अन्न पदार्थ आणि नियमित कसरतीमुळे अर्जुनची उंची वाढली असावी.
अशी वाढवता येऊ शकते उंची
एका संशोधनानुसार, मुलांची उंचीत 80 टक्के भाग हा जेनेटिकचा असतो. उर्वरीत 20 टक्के भाग हा वातावरणाचा, पोषक घटकांचा आणि जीवनशैलीचा असतो. आई-वडीलांची उंची कमी असली तरी मुलांची उंची वाढू शकते. त्यासाठी अर्थातच पोषक घटक आणि जीवनशैलीचा भाग महत्त्वाचा असतो.
उंची वाढवण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा ठरतो. उंची वाढवण्यासाठी प्रोटीन, कॅल्शियम,व्हिटामीन डी आणि इतर पोषक तत्वांची गरज असते. डाळी, पनीर, दूध, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असावा. सूर्यप्रकाशात काहीवेळ बसणे, चालणे फायद्याचे ठरते. नियमीत व्यायाम मुलांच्या शारिरीक विकासासाठी उपयोगी ठरतो. उड्या मारणं, धावणं, योगा आणि इतर कसरतींमुळे उंची वाढते. मुलांची उंची वाढवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.