मी किडनी द्यायला तयार, नेत्यासाठी जीव धोक्यात घालणारेही आहेत…

रविवारी रात्री मुलायम सिंहांची प्रकृती जास्त गंभीर झाली होती. युरिन इन्फेक्शन आणि ब्लड प्रेशरच्या समस्येवर उपचार सुरु आहेत.

मी किडनी द्यायला तयार, नेत्यासाठी जीव धोक्यात घालणारेही आहेत...
विद्यार्थ्यांचे आवडते होते मुलायम सर
Image Credit source: social media
| Updated on: Oct 06, 2022 | 9:38 AM

नवी दिल्लीः समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव (Mulayamsingh Yadav) यांची प्रकृती अद्याप चिंताजनकच आहे. युरिन इन्फेक्शन आणि ब्लड प्रेशरची गंभीर समस्या असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, समाजवादीच्या (Samajwadi Party) एका पदाधिकाऱ्याने अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना पत्र लिहिलंय. मुलायम सिंहांची प्रकृती सुधारण्यासाठी गरज पडली तर मी किडनी द्यायला तयार आहे. असं घडलं तर माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट ठरेल, असं वक्तव्य या पदाधिकाऱ्याने केलंय.

मुलायम सिंहांसाठी स्वतःची किडनी द्यायला तयार झालेले नेते म्हणजे मुंतजिम किडवई. हे समाजवादी विद्यार्थी परिषदेचे अलीगडचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी अखिलेश यादव यांना पत्र लिहिलंय.

त्यात मुंतजिम यांनी लिहिलंय, मुलायम सिंह यादव यांच्यासाठी किडनी देण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट ठरेल.

माध्यमांवर मुलायम सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यानंतर समाजपादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव तसेच मेदांता रुग्णालयाच्या व्यवस्थापकांना त्यांनी हे पत्र लिहिलंय.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून गंभीर आहे. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रविवारी रात्री मुलायम सिंहांची प्रकृती जास्त गंभीर झाली होती. युरिन इन्फेक्शन आणि ब्लड प्रेशरच्या समस्येवर उपचार सुरु आहेत.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी लखनौ, आग्रा, मुजफ्फरनगर, वाराणसीसहित विविध जिल्ह्यांमध्ये होम हवन केले जातायत. काही कार्यकर्त्यांनी महामृत्यूंजय जपही सुरु केलाय.