उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे फुसका बार! ठाकरेंच्या सभेवर कुणाचा निशाणा?

दसरा मेळाव्याला झालेल्या ठाकरे आणि शिंदे यांच्या सभांपैकी नेमकी कुणाची सभा सरस ठरली, यावरुन राजकीय प्रतिक्रियांना वेग

उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे फुसका बार! ठाकरेंच्या सभेवर कुणाचा निशाणा?
उद्धव ठाकरेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 8:18 AM

स्वप्निल उमप, TV9 मराठी, अमरावती : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dussehra Melava Speech) यांची शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभा म्हणजे फुसका बार आहे, अशा शब्दांत रवी राणा (Ravi Rana) यांनी टीका केलीये. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा आपल्यामध्ये आणली असल्यामुळे त्यांना हा देखावा करावा लागतोय, असंदेखील त्यांनी म्हटलंय. बाळासाहेबांच्या विचारधारेचा विसर पडल्यामुळे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिलाय, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं. ते अमरावतीत बोलत होते.

हिंदुत्त्वाचं नाव घेऊन, हिंदू विचारांची दिशाभूल ठाकरे करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय. हिंदुत्वाचा देखावा करण्याची गरज उद्धव ठाकरेंना का पडतेय, याचा विचार त्यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. उद्धव ठाकरेंना आता हिंदुत्व आठवलं, हे त्यांचं दुर्भाग्य आहे, असंही ते म्हणाले.

‘ठाकरेंचं संतुलन बिघडलं’

दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे बोलत होते, त्यावरुन त्यांचं संतुलन पूर्णपणे बिघडलंय, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेत स्पष्ट राग दिसून येत होता, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे वारंवार सांगतात की आमचा बाप चोरला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार होऊ शकतात. पण विचारधारा ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा विश्वास नवनीत राणा यांनी बोलून दाखवला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार शिंदेकडे होते म्हणूच एवढे लोक एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी आले होते, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अमरावतीत बोलतेवेळी ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेवर निशाणा साधला. दसरा मेळाव्याला झालेल्या दोन सभांपैकी कुणाची सभा सरस ठरली? यावरुन आता राजकीय प्रतिक्रियांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय.

Non Stop LIVE Update
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.