National Coffee Day 2022: कॉफीसह धूम्रपान करणाऱ्यांनी व्हा सावध, होऊ शकतात ‘ हे ‘ आजार !

| Updated on: Sep 29, 2022 | 1:02 PM

ऑफीस असो किंवा घर, चहा किंवा कॉफी पिणे हे आपल्या दिनचर्येचा एक भाग आहे. मात्र कॉफीचे अतिसेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

National Coffee Day 2022: कॉफीसह धूम्रपान करणाऱ्यांनी व्हा सावध, होऊ शकतात  हे  आजार !
कॉफीसह धूम्रपान करणाऱ्यांनी व्हा सावध, होऊ शकतात ' हे ' आजार !
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: आपल्यापैकी अनेक जण दिवसाची सुरूवात सकाळी चहा किंवा कॉफी (coffee) पिऊन करतात. काही लोकांना त्याची इतकी सवय असते की ते चहा/कॉफीशिवाय राहू शकत नाहीत. हे एक असे व्यसन बनते, जे न मिळाल्यामुळे डोकदुखी (health problems) सुरू होते किंवा बेचैन वाटू लागतं. संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार, कॉफी आणि चहामध्ये असलेल्या कॅफेनमुळे (caffeine) आपल्याला त्याचे व्यसन लागू शकते. ऑफीस असो किंवा घर, चहा किंवा कॉफी पिणे हे आपल्या दिनचर्येचा एक भाग आहे. आणि बहुतांश लोक कॉफी पिताना त्यासह धूम्रपानही (smoking) करतात. मात्र कॉफीचे अतिसेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का ?

आज जगभरात कॉफी डे 2022 साजरा केला जात आहे. याच निमित्ताने आम्ही तुम्हाला कॉफीचे अति सेवन करणे व त्यासह धूम्रपान करणे यासारख्या वाईट सवयीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देणार आहोत.

डिहायड्रेशन

ज्या लोकांना कॉफीसह धूम्रपान करण्याची सवय असते त्यांना अनेकदा डिहायड्रेशनचा त्रास होतो. शरीर डिहायड्रेटेड असेल तर ओठ व मानेवर काळेपणा जाणवू शकतो. याशिवाय डोळ्यांखाली काळी वर्तुळेही येऊ शकतात. इतकंच नाही तर कॉफीच्या सेवनामुळेही शरीरात बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

झोप न येणे

ज्या लोकांना जास्त कॉफी पिण्याची सवय असते त्यांना अनेकदा झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. कॅफेनमुळे आपली झोपेची यंत्रणा बिघडते. अशा परिस्थितीत एकदा झोप न येण्याचा त्रास सुरू झाला की तो बराच काळ सुरू राहतो. चांगली झोप येण्यासाठी व झोपेची पद्धत योग्य राहण्यासाठी कॉफीचे कमी प्रमाणात सेवन करावे.

पोटाच्या समस्या

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, चहा किंवा कॉफीमधील कॅफेनमुळे पोटाचे आरोग्य बिघडू शकते. कॉफी प्यायल्याने गॅस्ट्रिन हार्मोन्स रिलीज होतात, जे कोलनची ॲक्टिव्हिटी वाढवण्याचे कार्य करते. अधिक प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास पोट खराब होऊ शकते.

उच्च रक्तदाब

कॉफीच्या अतिसेवनाने उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते, असेही म्हटले जाते. उच्च रक्तदाबामुळे पेशींवर परिणाम होतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. तुम्ही जर उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे रुग्ण असाल तर कॉफीचे सेवन करताना काळजी घ्यावी.