AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्किन केअर टिप्स: त्वचेला नेहमी तरूण ठेवण्यासाठी नियमीत वापरा ‘स्कीन टोनर’ ; जाणून घ्या, नैसर्गिक टोनर कसे तयार करायचे

टोनर चे फायदे: त्वचेला तरूण ठेवण्यासाठी क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझिंगसोबतच टोनिंगही खूप महत्त्वाचे आहे. त्वचेवर टोनरचा वापर त्वचेच्या आतील भागातून येणारी जळजळ रोखण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे त्वचेवर सूज येत नाही.

स्किन केअर टिप्स: त्वचेला नेहमी तरूण ठेवण्यासाठी नियमीत वापरा ‘स्कीन टोनर’ ; जाणून घ्या, नैसर्गिक टोनर कसे तयार करायचे
त्वचेला नेहमी तरूण ठेवण्यासाठी नियमीत वापरा ‘स्कीन टोनर’ Image Credit source: twitter
| Updated on: Jun 09, 2022 | 7:52 AM
Share

त्वचेवर टोनर वापरण्याबद्दल तुम्ही बहुतेक सौंदर्य तज्ञांच्या तोंडून ऐकले असेल. टोनर त्वचेसाठी (Toner for skin) खूप चांगले मानले जाते. टोनर त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवण्याचे काम करते. त्वचा स्वच्छ करते आणि त्वचेच्या छिद्रांना घट्ट करते. जे लोक त्वचेवर टोनर वापरतात, त्यांची त्वचा डागरहित (Skin blemishes) आणि निरोगी राहते. टोनर छिद्र तेल मुक्त ठेवण्यासाठी आणि मृत पेशी दुरुस्त करण्यासाठी देखील कार्य करते. त्वचेला तरूण ठेवण्यासाठी क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझिंगसोबतच टोनर खूप महत्त्वाचे आहे. पण अनेक महिला टोनर वापरत नाहीत. परंतु, त्यामुळे तुमची त्वचा खूप खराब होऊ लागते. टोनिंगमुळे त्वचा टाईट होते. परंतु, जर तुम्हाला केमिकल उत्पादने (Chemical products) आवडत नसतील किंवा या गोष्टी तुमच्या त्वचेला शोभत नसतील तर तुम्ही घरी सहज नैसर्गिक टोनर तयार करू शकता. येथे जाणून घेऊया, नैसर्गिक टोनर बनवण्याचे सोपे मार्ग.

काकडी आणि गुलाब पाणी

  1. आजकाल बाजारात काकडी मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काकडीच्या रसापासून उत्तम टोनरही तयार करू शकता. यासाठी काकडीचा रस काढून त्यात गुलाबजल मिसळा. यानंतर हे मिश्रण एका बॉटल भरून फ्रीजमध्ये ठेवा. त्वचेवर नियमितपणे वापरा.
  2. तुम्ही तांदळाचे पाणी टोनर म्हणून देखील वापरू शकता. यासाठी तांदूळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी तांदळाचे पाणी वेगळे करा आणि त्यात दोन ते तीन चमचे लिंबाचा रस घाला. हे मिश्रण एका बॉटल भरून फ्रीजमध्ये ठेवा. त्याचा टोनर म्हणून नियमितपणे वापरा.
  3. कडुलिंबाचे झाड कुठेही सहज सापडते. आपण त्याच्या पानांपासून टोनर देखील तयार करू शकतो. यासाठी कडुलिंबाची पाने नीट धुवून पाण्यात टाका आणि हे पाणी गॅसवर ठेवून उकळा. सुमारे 30 मिनिटे मंद आचेवर पाणी उकळा. यानंतर हे पाणी गाळून बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. कडुलिंबापासून बनवलेले नैसर्गिक टोनर तयार आहे. गरज असेल तेव्हा वापरा.
  4. तुमच्या त्वचेवर मुरुमांची समस्या असल्यास तुम्ही घरगुती अँटी एक्ने टोनर देखील वापरू शकता. हे करण्यासाठी 4-5 चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर घ्या. त्यात २ चमचे पाणी घाला आणि अर्धा कप ताजा आणि पावडर ग्रीन टी मिक्स करा. सर्वकाही एकत्र मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. ही बाटली फ्रीजमध्ये ठेवा आणि टोनर म्हणून वापरा. वापरण्यापूर्वी बाटली चांगली हलवा.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.