AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sleepy At Work : काय बोलता! ऑफीसमध्ये डुलकी घेता येणार, जपाननं बनवलं नॅप बॉक्स, कसं झोपणार, जाणून घ्या…

कामाच्या ठिकाणी घटकाभर डुलकी काढून फ्रेश होण्यासाठी हे नॅप बॉक्स आहेत. टोकियोमधील एका कार्यक्रमात जपानमधील दोन प्रसिद्ध फर्निचर कंपन्यांनी या खास व्यवस्थेचे त्यांनी डिझाइन सादर केले आहे. 

Sleepy At Work : काय बोलता! ऑफीसमध्ये डुलकी घेता येणार, जपाननं बनवलं नॅप बॉक्स, कसं झोपणार, जाणून घ्या...
Sleepy At Work Image Credit source: social
| Updated on: Jul 28, 2022 | 9:14 AM
Share

मुंबई :  कामाच्या रहाटगाड्यात माणूस नीट झोपूही (Sleep) शकत नाही. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असतो तसेच आपले काम (Work) चांगले व्हावे, यासाठीचा दबावही असतो. जपानमध्ये ही समस्या अधिक आहे. कामाचे तास जास्त असल्यानं कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढताना खास नॅप बॉक्स तयार करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी घटकाभर डुलकी काढून फ्रेश होण्यासाठी हे नॅप बॉक्स आहेत. टोकियोमधील एका कार्यक्रमात जपानमधील दोन प्रसिद्ध फर्निचर कंपन्यांनी या खास व्यवस्थेचे डिझाइन सादर केले आहे. जपानमधील इटोकी आणि कोयजू प्लायवूड कॉर्पोरेशन या फर्निचर सप्लायर्सनी खास नॅप बॉक्स तयार केला आहे. यामध्ये मोठ्या शिफ्टचे कर्मचारी झोपू (Sleepy At Work) शकतात. मात्र यासाठी अट एवढीच आहे. की, त्यांना या बॉक्समध्ये आडवं न होता उभेच राहून झोपावे लागेल.

अमेरिकेतल्या इंडियाना राज्यातील बॉल स्टेट युनिव्हर्सिटीने एक अभ्यास प्रसिद्ध केला. यासाठी दीड लाख लोकांनी स्वतःच्या झोपेच्या सवयींविषयी माहिती दिली होती. यावरून असं आढळलं की रोज रात्री सात तास किंवा त्यापेक्षा कमी झोपणाऱ्या लोकांचं प्रमाण हे 2010च्या 30.9% वरून वाढून 2018मध्ये 35.6% झालं आहे. ही माहिती पुरवणाऱ्या लोकांपैकी अर्धेजण हे पोलीस अधिकारी आणि आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी होते. आपल्याला पुरेशी झोपच मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

परिणाम काय होतात?

  1. पुरेशी झोप न झाल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर
  2. अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो
  3. स्थूलपणा, मधुमेह, हृदयरोग आणि पक्षाघातासारख्या अनेक विकारांचा बाधा
  4. सतत अस्वस्थ असणं (Anxiety), नैराश्य यासारख्या मानिसक आजारांचा संबंध हा अपुऱ्या झोपेशी आहे.
  5. कमी झोपणाऱ्या लोकांचं प्रमाण हे 2010च्या 30.9% वरून वाढून 2018मध्ये 35.6% झालं
  6. पोलीस अधिकारी आणि आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी पुरेशी झोप मिळत नाही

अर्थव्यवस्थेला फटका

2016मध्ये रँड कॉर्पोरेशनने याविषयीचं एक विश्लेषण प्रसिद्ध केलं होतं. कर्मचाऱ्यांना पुरेशी झोप न मिळाल्याने त्याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला दरवर्षी 411 अब्ज डॉलर्सचा फटका बसत असल्याचं यात म्हटलंय. यामध्ये वाया जाणाऱ्या कामाच्या तासांचाही समावेश आहे.

उभेच राहून झोपावे लागेल

टोकियोमधील एका कार्यक्रमात जपानमधील दोन प्रसिद्ध फर्निचर कंपन्यांनी या खास व्यवस्थेचे डिझाइन सादर केले आहे. जपानमधील इटोकी आणि कोयजू प्लायवूड कॉर्पोरेशन या फर्निचर सप्लायर्सनी खास नॅप बॉक्स तयार केला आहे. यामध्ये मोठ्या शिफ्टचे कर्मचारी झोपू शकतात. मात्र यासाठी अट एवढीच आहे. की, त्यांना या बॉक्समध्ये आडवं न होता उभेच राहून झोपावे लागेल.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.